आपण आजपर्यंत अनेक धक्कादायक अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण सध्या अशा एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो यापुर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल. हो कारण, ब्रिटनमधील मँचेस्टरमध्ये घडलेल्या या अपघातामध्ये एका कारच्या धडकेमुळे इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. अनेकांचा या घटनेवर विश्वास बसत नाहीये. कारण कारच्या धडकेमुळे इमारत कशी कोसळू शकते? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यामुळे अनेकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
मँचेस्टरमधील टेमेसाइड येथे एका भरधाव कारने धडक दिल्यामुळे एक इमारत कोसळली आहे. कँटरबी स्ट्रीटवर घडलेली ही घटना ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय या कारच्या धडकेनंतर या परिसरामध्ये एखादा बॉम्ब फुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर या अपघातात इमारतीचा एक भाग पूर्णपणे कोसळल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर या इमारतीमधील साहित्यही रस्त्यावर विखुरल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
हेही पाहा- Video: स्टाईलमध्ये चहाचं पॅकिंग करणं पडलं महागात; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
कारचालक सुखरुप –
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालवणारी महिला दारूच्या नशेत गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या भयानक अपघातामधून महिला चालकक सुदैवाने सुखरुप बचावली असून तिला कसलीही गंभीर दुखापत झालेली नाही.
याच दुकानात दोन वेळा अपघात –
हेही पाहा- सिग्नल तोडून कार अचानक ट्रॅफिकमध्ये घुसली, भयंकर अपघाताचा Video पाहून अंगावर येईल शहारा
या इमारतीत यापूर्वीही अशी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मँचेस्टर इव्हिनिंग न्यूजच्या वृत्तानुसार, दुकानाचे मालक अॅलन फिश यांनी सांगितले की, एका कारने त्यांच्या दुकानाचे नुकसान केलं आहे. शिवाय चार महिन्यांत अशी दुसरी अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी दुकानाचे मालक बाहेर गेल्यामुळे ते बचावले आहेत. मात्र, कारने दुकानाला धडक दिल्यानंतर मोठा आवाज ऐकू येताच ते दुकानाकडे धावत आले. आपल्या दुकानाची अवस्था पाहून त्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, या घटनेनंतर दुकानाबाहेर साचलेला कचऱ्याचा ढीग हटवण्यात आला आहे. तर या अपघाताच्या घटनेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.