Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला रस्त्यावरून वेगाने सायकल चालवत रस्ता ओलांडत असतो अचानक एक बस भरधाव वेगाने येते आणि पुढे जे काही घडते ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल. या रस्त्यावरून वाहने जात आहे. तितक्यात एक चिमुकला वेगाने सायकल चालवत रस्ता ओलांडतो पण तितक्यात भरधाव वेगाने बस येते आणि सायकलला धडक देते. हा चिमुकला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडतो आणि थोडक्यात वाचतो. त्याच्या सायकलीचे मात्र नुकसान होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “लहान मुलांना रस्त्यावर सुरक्षित कसे वावरावे, याचे ज्ञान द्यावे. रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची दुसरी संधी देत नाही.”

Shocking video Caution For Momo Lovers! Vendor Spotted Kneading Momo Dough With Feet In Jabalpur
तुम्हीही रस्त्यावरचे मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? विक्रेत्याचा ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Suddenly the Truck overturned and all the bikes fell down on the road
अचानक ट्रक आडवा आला अन् रस्त्यावरील सर्व दुचाक्या धाडकन् आपटल्या, Video पाहून येईल अंगावर काटा
Biker performs dangerous stunt
‘यालाच खरं प्रेम म्हणतात का?’ स्टंटच्या नादात प्रेयसीचा जीव घातला धोक्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

हेही वाचा : पुणेकरांची सार्वजनिक बाल्कनी माहितीये का? चांदणी चौकातील पुलावर आहे ही जागा, VIDEO VIRAL

पाहा व्हायरल व्हिडीओ

roadsafetycontent या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुरक्षित चालवा, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाळा तुझं नशीब खूप चांगले आहे. नक्कीच तुझ्या आई-बाबांनी चांगले कर्म केले असतील.” तर एका युजरने लिहिलेय, “लोक येता जाता गाडीवाल्यांना मारतात पण आपल्या मुलांना काही आवरत नाही शंभर टक्के चूक या मुलाची आहे. पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे मुलं कुठे जातात, काय करतात? एवढ्या लहान मुलांच्या हातात एवढी मोठी सायकल देणे चुकीचे आहे बरं झालं त्या मुलामुळे त्या माणसाचा जीव गेला नाही करतो कोण आणि भरतो कोण असं होऊन जातं आता त्या मुलाला काही झालं असतं तर लोक म्हणाले असते गाडीवाल्याचे चूक आहे पण मुलाची चूक काय आहे ते बघितलं नाही, बरं झालं सीसीटीव्ही कॅमेरे निघाले आहेत आता” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशीबाची साथ आणि आई बापाची पुण्याई”

हेही वाचा : Fandry Movie: ‘तुज्या पिरतीचा…’ बाकाच्या तालावर सादर केलं विद्यार्थ्याने गाणं; VIDEO तील ‘त्याचे’ ताल, सूर ऐकून तुम्हीही धराल ठेका

अनेकदा लहान मुले रस्त्यावर काळजीपूर्वक सायकल चालवत नाही आणि अपघाताला बळी पडतात. त्यामुळे लहान मुलांनी रस्त्यावर सायकल चालवताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याबरोबर पालकांनी सुद्धा मुलांवर लक्ष ठेवणे, अपेक्षित आहे