Viral video सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ पाहून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल. एका व्यक्तीने चक्क भविष्य सांगणाऱ्याचेच भविष्य सांगितलंय..तुम्ही आतापर्यंत ज्योतिष सांगणारे किंवा ऑनलाइन अॅप वगैरे पाहिले असेल. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ लक्ष वेधून घेतात त्यापैकीच हा एक..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गावात भविष्य सांगायला आलेल्या ज्योतिषाला एका व्यक्तीने त्याचेच भविष्य सांगितले आहे. एरवी लोक अशा ज्योतिषांकडे आपला हात घेऊन जात असे, मात्र या व्यक्तिने थेट या ज्योतिषाचाच हात हातात घेऊन भविष्य सांगायला सुरुवात केली. यावेळी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, हा व्यक्ती अगदी अनुभवी ज्योतिषासारखाच बोलत आहे. “तू लोकासाठी खूप करतोस पण तुझ्यासाठी कुणी करत नाही” तसेच “तोंडात रसवंती आहे तुझ्या पण राजकारणात कधी पडू नकोस”, अशाप्रकारे अनेक सल्ले हा व्यक्ती ज्योतिषालाच देत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट हसाल.
पाहा व्हिडओ
हेही वाचा >> धक्कादायक! विद्यार्थिनीने डोक्यात फेकून मारली लोखंडी खुर्ची, शिक्षिका जागीच बेशुद्ध; घटनेचा Video Viral
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने म्हंटलंय की, “हा ज्योतिष चुकुनही पुन्हा या गावात येणार नाही”. सोशल मीडियावर रोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात.