सोशल मीडियावर एका उबर ड्रायव्हरच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये तो ड्रायव्हर आपल्या कॅबमध्ये एका महिलेशी गैरवर्तन करताना सापडला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने या ड्रायव्हरवर बंदी घातल्याची माहिती देखील समोर आली आहे.

व्हिडीओमध्ये नक्की काय आहे –

Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Indapur Truck Drunk and Drive
Pune Indapur Truck : पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार! हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने हॉटेलमध्ये घातला ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
Hyundai Alcazar Facelift New Tvc Released With Brand Ambassador Shahrukh Khan
Hyundai Alcazar Facelift: नवीन ह्युंदाई अल्काझार कारची मार्केटमध्ये जोरदार चर्चा; शाहरुख खानसोबतचा नवा व्हिडिओ समोर
success story police officer competitive examination education government service mpsc upsc marathi onkar gujar
VIDEO: अखेरचा हा तुला दंडवत…दीड फुटाचा डेस्क अन् त्यावर गाळलेला घाम; सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये उबर ड्रायव्हरने एका घरासमोर कार पार्क केल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी तो नशेत असल्याचंही दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ड्रायव्हर कारच्या मागील सीटवर बसला होता, ज्या ठिकाणी एक महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याचं आढळलं आहे. शिवाय तो या मुलीबरोबर गैरवर्तन करताना सापडला आहे.

हेही पाहा- धक्कादायक: शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी रागारागत मारल्या ११०० कोंबड्या; आता मारतोय कोर्टात चकरा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इस्टर रविवारी रॉचडेलमध्ये घडली. या वेळी कार ड्रायव्हर आपल्या सीटवर बसण्याऐवजी एका बेशुद्ध महिलेच्या शेजारी पॅंट खाली ओढून बसला होता. या वेळी कारच्या खिडकीतून एका व्यक्तीने ड्रायव्हरचे हे कृत्य शूट करण्याचा प्रयत्न करताच ड्रायव्हरने आपली पॅंट वर ओढली आणि कारचा दरवाजा उघडून तो पुढील सीटवर बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

पोलिसांनी केली कारवाई –

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी ओल्डहॅमच्या येथील ३७ वर्षीय मोहम्मद जमालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये उबर ड्रायव्हर वारंवार सॉरी म्हणताना दिसत आहे. तर शूटिंग करणारी व्यक्ती ड्रायव्हरला, तू काय करत आहेस? रमजानच्या महिन्यात तुम्ही अशी कामे करताय? हे वाईट आहे. माझी मुलं येथे आहेत. असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे.

हेही पाहा- बायको फूल देत म्हणाली ‘I Love You’; आजोबांनी दिलं जबरदस्त उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

उबरने चालकावर घातली बंदी –

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच उबरने आपल्या चालकावर बंदी घातली आहे. याशिवाय उबेरच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हिडिओमध्ये जे काही दिसले त्यामुळे आम्ही खूप घाबरलो आणि अस्वस्थ झालो असून आम्ही पुढील कार्यवाही ोकरत आहोत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. तर महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या ड्रायव्हरवर कठोरात कठोर शिक्षा करण्याचे मागणी देखील अनेकांनी केली आहे.