आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. आईच्या प्रेमात इतकी ताकद असते की ती आपल्या बाळाला मृत्यूच्या दारातूनही खेचून आणू शकते. दरम्यान असाच काहीसा भावनिक व्हिडीओ समोर आला आहे, आपल्या मृत बाळाला पुन्हा जिवंत करण्यासाठी हत्तीची चाललेली धडपड कॅमेरात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हत्तीचा बाळ तीन दिवसांपूर्वी त्यांच्या कळपामधून बाहेर पडलं, जंगलात हरवलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला आहे. परंतू त्यांच्या आईनं त्याला सोडलं नाही. त्याच्या आईने त्याला दोन किलोमीटरपर्यंत एका छोट्या नदीत सोबत घेऊन आली. त्याचबरोबर त्याला जिवंत करण्याता प्रयत्न सुध्दा तिने केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, हे पाहून माझं ह्दय तुटलं आहे. बाळाचा मृत्यू झाला आहे तरी सुद्धा आईने हार मानली नाही. त्याची आई त्याला दोन किलोमीटर पाण्यातून घेऊन आली आहे, त्याचबरोबर त्याला जिवंत करण्याचा ती प्रयत्न सुध्दा करीत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.

Elephant charges at man after persistent teasing
Viral Video : तरुणाने काढली हत्तीची छेड, संतापलेला हत्ती अंगावर आला धावून…पाहा पुढे काय घडले!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
The elephant stopped the cub approaching the strangers
“आई तुझ्या प्रेमाची सर कशालाच नाही…” अनोळखी लोकांजवळ जाणाऱ्या पिल्लाला हत्तीने अडवलं; VIDEO पाहून नेटकरीही भारावले

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – वाघाने घातली बैलावर झडप, अक्षरश: फाडून खाल्लं, शिकारीचा Video पाहून येईल अंगावर काटा

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडीओ लोक शेअर करत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. इंटरनेटवर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या आईची आठवण झालीय.

Story img Loader