सध्या अनेक लोक आपल्या घरात प्राण्यांना पाळतात आणि त्यांना अगदी घरच्या सदस्यांप्रमाणे वागवतात त्यांची खूप काळजी घेतात. त्यामुळे हे मुके प्राणीदेखील आपल्या मालकांवर जीव लावतात. घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने कुत्र्याचा आणि मांजरांचा समावेश असतो.

अनेक पाळीव प्राण्यांनी आपल्या मालकाची मदत केल्याचे किंवा त्यांना एखाद्या मोठ्या संकटातून वाचवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायपर होत असतात. ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील. अनेकदा हे पाळीव प्राणी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करत असात. शिवाय आपल्या मालकावर कोणी हल्ला केला तर ते त्यांना सहन होत नाही. तसेच घरातील प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असल्यासारखे ते वावरत असतात.

हेही पाहा- धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये भररस्त्यात गायीच्या वासराची चोरी, घटनेचा Video होतोय व्हायरल

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घरातील पाळीव मांजरीमुळे एका लहान मुलाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल यात शंका नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा हा व्हिडीओ @ukilaw नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो शेअर करताना व्हिडीओमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “हिंदू धर्मात सर्व संजिवांमध्ये देवाचा अंश असल्याचे शिकवलं जाते. शिवाय मांजर हे माता षष्ठी देवीचे वाहन आहे, ज्याची आकस्मिक मृत्यू आणि अपघातांपासून वाचवण्यासह मुलांचे रक्षक म्हणून त्याची पूजा केली जाते. या मांजरीत देवीचा आत्मा दिसत नाही का?”

काय आहे व्हिडीओ –

हेही पाहा- दुचाकीच्या नंबर प्लेटवरचा भगव्या रंगातील ‘तो’ मजकूर तरुणाला पडला महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला घरात फरशीवर खेळताना दिसत आहे. त्याच्या शेजारी असणाऱ्या सोफ्यावर मांजर बसल्याचंही दिसत आहे. यावेळी लहान मुलगा रांगत रांगत पुढे जातो, पण तो ज्या बाजून जातो तिथून पुढे उंच पायऱ्या असल्याचं दिसत आहे. मुलगा पुढे जाऊन पायऱ्यांवरुन खाली पडणार इतक्यात मांजर पळत जाते आणि त्या मुलाला मागे ढकलते. ज्यामुळे तो मुलगा मोठ्या अपघातापासून बचावतो. शिवाय मुलगा पुन्हा पायऱ्यांकडे जाईल म्हणून ती मांजर तिथेच दारावर उभी राहिल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मांजरीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. शिवाय या व्हिडीओवर ते वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील देत आहे. एका नेटकऱ्याने पाळीव प्राणी खरचं प्रामाणिक असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader