शालेय जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. शाळेत फक्त अभ्यास नाही तर मज्जा-मस्ती देखील केली जाते. चित्रकलेच्या तासाला चित्र काढताना, क्रीडांच्या तासाला मैदानावर खेळायला शालेय विद्यार्थ्यांना भरपूर मज्जा येते. अशा गोष्टी करताना विद्यार्थ्यांमधील खरी कौशल्य समोर येतात. कोणी सुंदर चित्र काढतो, कोणी सुंदर कोरीव काम करतो, कोणी कागदाची सुंदर वस्तू किंवा फूले बनवतो तर कोणी छान छान गोष्टी सांगते तर कोणी युक्ती वापरून जादू करून दाखवतो. मुलांमधील ही विविध कौशल्य त्यांच्याबरोबर सर्वांचे मनोरंजन करतात. सध्या अशाच एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी भन्नाट जादू दाखवत आहे जे पाहून नेटकऱ्यांच्या चेहर्‍यावर हसू आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, शालेय गणवेश परिधान केलेले काही विद्यार्थी जमिनीवर बसले आहे तर तीन विद्यार्थी उभे राहून जादू दाखवत आहे. दोन विद्यार्थी जमिनीवर दोन पायांवर अधांतरी बसले आहेत आणि त्याच्यासमोर एक चादर आहे. एक छोटा चिमुकला त्यांच्या समोर उभा आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने चादर पकडून दोघंही उभे राहतात आणि जोरजोरात चादर हलवतात त्यानंतर मागे असलेला चिमुकला दिसत आहे. त्यानंतर पडदा पडतो आणि चिमुकला गायब होतो आणि दूर असलेल्या वर्गाच्या खिडकीत उभा असल्याचे दिसतो. चिमुकल्यांची जादू पाहून सर्वजण टाळ्या वाजवतात.

हेही वाचा –उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral

येथे पाहा Video

चिमुकला धावत त्या खिडकीपर्यंत पोहचला हे लगेच लक्षात येते पण चिमुकल्याचे हाच निरागसपणा पाहून नेटकऱ्यांच्या चेहर्‍यावर मात्र हसू येते. व्हायरल व्हिडिओ ranjana_._kumre नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मा‍झ्या शाळेतील हुशार विद्यार्थी आहेत.”

व्हि़डीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “कस का असेना पणलहान मुलांचे प्रयत्न पाहून भारी वाटले.”

दुसऱ्याने लिहिले की,”मनापासून हसू आलं”

तिसऱ्याने लिहिले की, “व्हिडिओ पाहून खरंच लय भारी वाटलं”

हेही वाचा –Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”

चौथ्याने कमेंट केली, “मुलांना अशा गोष्टीत आनंद वाटतो पण खूप छान जादू होती”