सोशल मीडियावर शाळकरी मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकतचं व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाळकरी मुले आपले टॅलेंट दाखवत आहेत, ज्याला पाहून सगळे हसत होते. शाळेतील या मुलांना शिक्षकांनी त्यांचे टॅलेंट दाखवण्यास सांगितले, त्यानंतर त्यांनी त्यांचे कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. त्याचं टॅलेंट बघून वर्गात उपस्थित एकचं हशा पिकला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

या व्हिडीओमध्ये चार लहान मुले दिसत आहेत. वर्गात उपस्थित शिक्षक त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्यास सांगतात, त्यानंतर चार मुले एक एक करून कुत्र्याचा आवाज काढू लागतात. आश्चर्य म्हणजे चारही मुलांनी कुत्र्याचे वेगवेगळे आवाज काढले. शेवटी, मुलाने कुत्र्याचा असा आवाज काढला की जणू कोणीतरी त्याला मारले आहे.

(हे ही वाचा: Viral Video: कारच्या बोनेटवर बसून एक व्यक्ती करत होती धोकादायक स्टंट आणि…)

(हे ही वाचा: Viral Video: लंगड्या कुत्र्याचे धाडस बघून सिंह-सिंहिणीलाही फुटला घाम!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या शाळकरी मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, त्यानंतर हा व्हिडीओ आता अनेक प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. या व्हिडीओवर यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. यूजर्सचे म्हणणे आहे की, या मुलांची मजा बघून आम्हाला आमचे जुने दिवस आठवले, तर कोणी म्हणाले की या मुलांमध्ये किती छान टॅलेंट आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The children in the class showed their unique talent in front of the teacher must watch this viral video once ttg