आजच्या काळात नोकऱ्या मिळवणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीत अर्जदारांची संख्याही जास्त आहे. अशा परिस्थितीत सर्वोत्तम व्यक्तीची निवड करण्यासाठी कंपनी त्यांची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी घेते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारालाच नोकरी मिळते. नोकरी मिळावी यासाठी बहुतांश जण मुलाखतीला जाताना वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण तयारी करतात. काही वेळा मुलाखतीच्या वेळी विचित्र किस्से घडल्याचंही आपण ऐकतो, वाचतो. सध्या असाच एक प्रकार खूप चर्चेत आहे. दरम्यान, एका कंपनीने एका महिलेला असा प्रश्न विचारला की, उत्तर नेमकं द्यावं तरी काय, असा प्रश्न महिलेसमोर उभा राहिला.

महिलेने फोटो केला शेअर

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर करताना बीटा नावाच्या महिला युजरने तिचा एका कंपनीसोबतचा अनुभव शेअर केला. त्याचा स्क्रीनशॉट आता इंस्टाग्रामवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये महिलेने लिहिले की, “जॉब अॅप्लिकेशनवर मी पाहिलेला हा सर्वात विचित्र प्रश्न आहे.”

What is ossification test How did the trial reveal the age theft of the suspect in the Baba Siddique murder case
‘ऑसिफिकेशन चाचणी’ म्हणजे काय? बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयिताची वयचोरी या चाचणीने कशी उघडकीस आली?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
uma mani the coral woman of india
उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास
supreme court Tightening the law on child pornography
यूपीएससी सूत्र : चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन् ‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासक्रम, वाचा सविस्तर…
AI technology will be use in Bopdev Ghat gang rape case
बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणातील तपासात एआयचा वापर
Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview
नाट्यरंग : पाहिले न मी तुला – दृष्टिकोनातील फरकाचा लोच्या
Krystle D'Souza's 60-Hour Non-Stop Shoot: Impact on the Body
अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने केले होते ६० तास नॉन-स्टॉप शूट! विश्रांती न घेता काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Three Walking yoga types to Include in Your Morning Walk – Viral Video
तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जाता? हे तीन प्रकार करा चालण्यात समाविष्ट, VIDEO एकदा पाहाच

असं कोणतं प्रश्न कंपनीने महिलेला विचारलय. ज्यामुळे महिलेने सर्वात विचित्र प्रश्न असल्याचे म्हटले आहे. कंपनीने नोकरीच्या अर्जात महिलेला विचारले, “तुम्हाला एक हत्ती देण्यात आला आहे तुम्ही ते देऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही तुम्ही हत्तीचे काय करणार?” हा प्रश्न वाचून जणू काही ही महिला UPSC मुलाखतीला बसली आहे, असं वाटतयं. हा प्रश्न ऐकताच महिला उत्तर नेमकं द्यावं तरी काय या विचारात पडली. मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

(हे ही वाचा : तत्काळ तिकीट बुकिंगसाठी व्यक्तीने महत्त्वाची मीटिंग केली रद्द! पोस्ट व्हायरल )

येथे पाहा व्हायरल पोस्ट

लोकांनी दिली मजेशीर उत्तरे

इंस्टाग्रामवर नगेट नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. वृत्त लिहिपर्यंत १९ हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला पसंत केले आहे. पोस्ट पाहिल्यानंतर आणि प्रश्न वाचल्यानंतर लोकांनी खूप मनोरंजक उत्तरेही दिली आहेत. एका यूजरने विनोदाने लिहिले, “याचं उत्तर सोपं आहे, फ्रीज उघडा, त्यातून जिराफ काढा आणि हत्तीला आत बंद करा.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “त्या हत्तीला युद्धात घेऊन जा” तिसरा युजर म्हणाला, “जर तुम्हाला काम दिले जात नसेल तर स्पष्टपणे नकार द्या,” हे किती हास्यास्पद कृत्य आहे. बरं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे का, जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर कृपया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.