आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. अनेक लोक अवघड कामे सोपी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडीया शोधत असतात, शिवाय असे लोक आपल्या जुगाडाच्या साहाय्याने कठीण कामे काही क्षणात पूर्णही करतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. शिवाय असे भन्नाट जुगाड केवळ इंजिनिअर्स करतात असं नाही, तर अनेकवेळा गरीब शेतकरी, बांधकाम मजूरही आपली अवघड कामे सोपी करण्यासाठी जुगाड करत असतात. सध्या अशाच काही बांधकाम मजुरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांनी त्यांच्या कामाचं आणि त्यांच्या बुद्धीचे कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही बांधकाम मजुरांनी मिळून एक अनोखी सिस्टीम तयार केली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की, हे मजूर सिमेंटचा पत्रा बांधकामाच्या उंच ठिकाणी नेण्याचे काम करत आहेत. शिवाय हा पत्रा जाड असल्यामुळे तो वरती घेऊन जाणं सोप नसल्याचंही व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. अशावेळी या कामगारांनी एक भन्नाट देशी जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये काही कामगार मिळून सिमेंटचा पत्रा वरती घेण्यासाठी तो पत्रा दोरीने बांधतात आणि तो दोन बांबूच्या सहाय्याने वर नेतात. पण ते हा पत्रा ज्या पद्धतीने घेऊन जात जात आहेत. ते पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हो कारण हा पत्रा वर नेण्यासाठी दोन मुले चक्क दोरीला लटकताना व्हिडीओत दिसत आहेत. शिवाय ते जसे जोरात दोरी ओढतात तसा पत्रा काही क्षणात वरती जाताना दिसत आहे. या वेळी वरती उभे असलेले काही मजूर तो पत्रा अलगद पकडतात आणि तो त्यांना हवा त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवताना दिसत आहेत.
हेही पाहा- मेट्रोतही बसण्यावरून राडा, महिलेनं थेट मिरची स्प्रे मारला डोळ्यात; Video तुफान व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय कामरांच्या या भन्नाट युक्तीला अनेकांनी दाद दिली आहे. या देशी जुगाडाचा व्हिडीओ बिलाल अहमद नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “ही एक उत्तम आयडीया आहे.” आणखी एकाने, आपल्या देशातील कामागारांकडे खूप टॅलेंट असल्याचं म्हटलं आहे.