सध्या पंजाबमधील पटियाला येथील एका घरात घडलेल्या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किचनमध्ये स्वयंपाक करताना असे काही घडले आहे, जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. या व्हिडीओत, एक महिला गॅसवर कुकरमध्ये अन्न शिजवत असतानाच अचानक कुकरचा बॉम्बसारखा स्फोट झाला आहे. हा स्फोट किती भयंकर आहे याचा अंदाज व्हिडीओ पाहून लावला जाऊ शकतो.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. यावेळी तिथेच एक लहान एक मूल खेळत असल्याचंही दिसत आहे. शिवाय घरातील अन्य सदस्य इकडे-तिकडे करत असताना अचानक मोठा स्फोट होतो आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. सध्या या भयानक घटनेचा सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
Car blast at petrol pump while filling cng viral video on social media
पेट्रोल पंपावर सीएनजी भरताना कारचा झाला स्फोट; पुढे ‘जे’ घडलं ‘ते’ धक्कादायक, पाहा थरारक VIDEO
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Young man died due to electric wire shocking video goes viral on social Media
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?

हेही पाहा- VIDEO : चक्क प्रियकरावरील राग काढण्यासाठी दिली ऑर्डर, ऑनलाइन डिलिव्हरीचा विचित्र वापर पाहून डोकेच धराल

या भयंकर घटनेचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर @Gagan4344 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सुदैवाची बाब म्हणजे या भयंकर स्फोटात घरातील कोणत्याही सदस्याला दुखापत झालेली नाही. परंतु, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जेवण बनवताना योग्य ती काळजी घेतली नाही तर किती मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो हे पाहायला मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

व्हायरल व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “खूप भयानक व्हिडिओ आहे” तर दुसऱ्याने लिहिलं, “आता कुकरचीही भीती वाटायला लागली आहे.” तिसऱ्या एकाने लिहिलं, “गीझरचा स्फोट, सिलेंडरचा स्फोट आणि आता कुकरचा स्फोट.. घरगुती उपकरण सुरक्षित आहेत का नाही?”

Story img Loader