माणसाला सर्व काही फुकट हवं असतं म्हणतात. एखादी गोष्ट मोफत मिळणार असेल तर अनेकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. एखादी गोष्ट फुकट मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा अंदाज लावता येणार नाही. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोफत जेवण मिळवण्यासाठी या जोडप्याचे जे कृत्य केले आहे ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदित भंडारी नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने गुरुग्राममधील एका मध्यमवयीन जोडप्याची गोष्ट सांगितली आहे जे महागड्या रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण खाण्यासाठी विचित्र जुगाड वापरत आहेत. हे ऐकल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांना धक्का बसला आहे.

भंडारी यांनी गुरुग्राममधील एका मित्राच्या घरी एका पार्टीत या जोडप्याची भेट कशी झाली हे सांगितले. कार्यक्रमादरम्यान, जोडप्याने नकळतपणे त्यांचे फसवणूक करण्याचे वर्तन उघड केले. हे जोडपे दिल्ली आणि गुरुग्राममधील पॉश रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण मिळावे यासाठी मेलेली माशी घेऊन जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या जेवणाच्य दरन्यान ते माशी काळजीपूर्वक अन्नामध्ये ढकलत असे आणि नंतर अस्वच्छतेचा बनाव करून नुकसान भरपाईची मागणी करत असे. परिणामी, रेस्टॉरंट व्यवस्थापन, नकारात्मक प्रसिद्धी टाळण्यासाठी आणि असंतुष्ट ग्राहकांना संतुष्ट करण्याच्या उद्देशाने अनेकदा बिल माफ करते किंवा मोफत जेवण देत असे.

हेही वाचा – सहा सिंहाच्या तावडीत सापडला एकटा झेब्रा, एकापोठापाठ एक सिंह मारत होता झडप तरी…. Viral Videoमध्ये पाहा थरारक शिकार!

भंडारी सांगितले की या जोडपे मज्जा घेण्यासाठी असे वागत होते, कारण ते आर्थिकदृष्ट्या तणावग्रस्त दिसत नव्हते. “मोफत अन्न मिळवण्यासाठी हा ‘हॅक’ शेअर केल्याचा त्याला अभिमान होता आणि त्यांनी हे अनेकदा केले आहे. भंडारी यांनी पुढे या जोडप्याच्या कृतीवर अविश्वास आणि रोष व्यक्त केला.

हेही वाचा – “मला तुमची मदत हवीये”; भटक्या कुत्र्यासाठी रतन टाटांची मुंबईकरांना आर्त हाक

हा किस्सा ऐकून नेटकऱ्यांना देखील रोष व्यक्त केला. इअनेकांनी जोडप्याच्या अप्रामाणिक वागणुकीचा निषेध केला. हा किस्सा उघड झाल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्येव्यवस्थेचा गैरफायदा घेऊन हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचा गैरफायदा घेण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकतात यावर चर्चा रंगली आहे. काही लोक त्यांच्या स्वतःच्या छोट्या फायद्यासाठी किती प्रमाणात फसवणूक करू शकतात हे लक्षात घेऊन सावधिगिरी बाळगळी पाहिजे असेही काहींनी सुचवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The couple did this to get a free meal at an expensive restaurant netizens