जगभरात नुकतेच नववर्षाचे उत्साहत स्वागत करण्यात आले, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक शहरं ३१ डिसेंबरच्या रात्रीच सज्ज झाली होती. अनेक शहरांमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवाय कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर यंदाचे पहिलेच नववर्ष असल्यामुळे अनेकांनी ते मोठ्या जल्लोषात साजरे केले. त्याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.
पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करणाऱ्या मुंबईतील ३१ डिसेंबरच्या रात्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहेच शिवाय तो तुम्हालाही आवडेल यात शंका नाही. अनेक लोक मुंबईवर जीवापाड प्रेम करतात, अशातच जर दोन प्रेमी मुंबईत एकत्र आल्यावर काय करु शकतात, याचं एक उदाहरण समोर आलं आहे.
हेही पाहा- ‘रिव्हर्स ब्रिज’वरुन जाणारी वाहने अचानक होतात पाण्यात गायब? व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे मरीन ड्राइव्हसमोरील एका हॉटेलच्या बाल्कनीत एकमेकांना किस करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी आपल्या खिडकीचा पडदा किस करताना उघडाच ठेवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
हेही पाहा- Video: कपड्यांमुळे निर्दयी जमावाची मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण, म्हणाले “असे कपडे पुरुषांना…”
मरीन ड्राइव्हसमोरच्या बाल्कनीत उभे एकमेकांना किस करणाऱ्या जोडप्याचा हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या जोडप्याचा किस करतानाचा क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
या व्हिडिओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘किती सुंदर व्हिडिओ आहे, पाहून छान वाटले.’ दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे, ‘व्वा काय सीन आहे.’ तर आणखी एका नेटकऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना ‘मुंबईकर सदैव मुंबईकरच राहणार’ असे म्हटले आहे. हा व्हिडिओ everything.mumbai नावाच्या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला असून आतापर्यंत तो ४ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे.