सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात आपणाला दररोज नवनवीन प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही भयानक असतात. या व्हिडीओमध्ये सापांशी संबंधित व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. खरं तर, लहान असो वा मोठा, साप पाहिला की आपल्या अंगावर काटा येतो. अशातच जर आपल्यासमोर एखादे भलेमोठे अजगर आले तर आपली काय अवस्था होऊ शकते? हे शब्दात सांगण कठीण आहे. पण काही काही असेही लोक असतात, जे अशा भयानक सापांना न घाबरता पकडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा भल्यामोठ्या अजगराला पकडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही.
या मुलाचा व्हिजीओ एक्स (ट्विटर) वर @sanjaysabka नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “शालिग्रामधील खतरों के खिलाडी.” १ मिनिट ५५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती एका भल्यामोठ्या अजगराला झुडपातून बाहेर काढताना दिसत आहे. याचवेळी तिथे एक निळा टी-शर्ट घातलेला मुलगा तिथे येतो आणि तो त्या व्यक्तीला मदत करायला सुरुवात करतो. आश्चर्याची बाब म्हणजे हा मुलगा न घाबरता थेट या अजगराचे तोंड पकडतो. या मुलाने केलेलं धाडस पाहून अनेकांनी त्याचं तोंडभरुन कौतुकं केलं आहे. तर काही लोकांनी असलं भलतं धाडस अंगलट येऊ शकतं असंही म्हणत आहेत.
२३ नोव्हेंबर रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “धाडसी मुलगा” तर दुसर्याने लिहिलं, “असे काम करण्यासाठी खूप धाडस लागते.” तर काही नेटकऱ्यांनी असलं भलतं धाडस करु नका अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो असंही लिहिलं आहे.