सोशल मीडियावर काही दिवसांपासून भूपेंद्र जोगी #bhupendrajogi हे नाव खूप ट्रेंडमध्ये आहे. हे नाव आज सगळ्यांच्या तोंडावर आहे. त्यावर अनेक मीम्सदेखील तयार केल्या जात आहेत. काही जण भूपेंद्र जोगीच्या व्हिडीओला रिक्रिएट करतानाही दिसून येत आहेत. पण, व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाच वर्षांपूर्वीचा आहे. भोपाळच्या न्यू मार्केटमध्ये निवडणुकीदरम्यान ही व्यक्ती भेटली होती. या व्यक्तीला कोणताही प्रश्न विचारला तरीही ती फक्त एकच उत्तर द्यायची ते म्हणजे स्वतःचे नाव ‘भूपेंद्र जोगी’. या गोष्टीमुळे हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतो आहे आणि त्यावर अनेक मीम्स बनवल्या जात आहेत. आता या ट्रेंडच्या जाळ्यात झोमॅटो (Zomato) फूड डिलिव्हरी ॲपसुद्धा अडकले आहे.
झोमॅटो ॲपने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये झोमॅटो त्याच्या ग्राहकासोबत संवाद साधताना दिसत आहे आणि या संवादामध्ये दोन मीम्स आहेत; ज्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे. रितिक असे या ग्राहकाचे नाव आहे. त्याने झोमॅटोला मेसेज केला आहे की, मी अनेक पदार्थ ऑर्डर केले आहेत. एका पदार्थात कस्टमायजेशन (customisation) हवे आहे. ते शक्य आहे का? त्यावर झोमॅटोकडून उत्तर मिळते की, मी हॉटेलच्या पार्टनरबरोबर बोलून सांगतो. कृपया तुमचे नाव सांगू शकाल का? त्यावर रितिक या ग्राहकाने काय उत्तर दिले एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा…
पोस्ट नक्की बघा :
ग्राहकाने भूपेंद्र जोगी असे सांगितले स्वतःचे नाव :
पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, झोमॅटोकडून ग्राहकाला त्याचे नाव विचारले जाते तेव्हा ग्राहक भूपेंद्र जोगी, असे स्वतःचे नाव सांगतो. त्यावर झोमॅटोचा प्रतिनिधी चकित होतो आणि आएं (AAYEIN) असा इंग्रजी अक्षरात लिहिलेला आश्चर्यचकित हावभाव व्यक्त करणाऱ्या मुलाचा एक मीम त्याला पाठवतो. ट्रेंड फॉलो करीत स्वतःचे नाव रितिक असूनही मजा-मस्ती करण्यासाठी ग्राहक झोमॅटोच्या प्रतिनिधीबरोबर असा मजेशीर संवाद साधतो. त्यावर तो प्रतिनिधीही नाराज न होता, अगदीच हास्यास्पद प्रतिक्रिया ग्राहकाला देतो आणि ही पोस्ट शेअर करतो.
सोशल मीडियावर ही पोस्ट झोमॅटोच्या अधिकृत @Zomato या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच काही जण त्यांच्या रितिक नावाच्या मित्रालाही पोस्ट टॅग करताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसून आली आहे.