Viral Video: एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं रे झालं की, सोशल मीडियावर ते खूप चर्चेत येतं. त्या गाण्यावर लोक अनेक रील्स, व्हिडीओ बनवतात. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना रील्स बनवल्याशिवाय राहवत नाही. सध्या ‘गुलाबी साडी’ हे गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेकांनी रील्स बनवल्या आहेत. आता अशाच एका चिमुकलीचा डान्स तुफान व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल.

लहान मुलं खूप निरागस आणि निर्मळ असतात. कारण त्यांना आपण जे सांगतो, जे शिकवतो, त्याच गोष्टी ते लक्षपूर्वक पाहतात आणि करतात. हल्लीचे पालक मुलं त्रास देऊ लागली की, त्यांच्या हातात मोबाईल देतात. त्यांना सोशल मीडियावरील रील्स, गाणी, विविध व्हिडीओ दाखवतात. मग काय या सर्व मनाला भुलवणाऱ्या गोष्टी पाहिल्यावर त्यांनादेखील या सर्व गोष्टींचे व्यसन लागतं. अनेक पालक तर आपल्या मुलांनीदेखील इतरांसारखा अभिनय करावा, डान्स करावा यासाठी त्यांना या सर्व गोष्टी शिकवतात. दरम्यान, आता देखील अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय जो सध्या खूप चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगी गुलाबी रंगाची साडी नेसून गुलाबी साडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या मुलीचा डान्स, त्यातील स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव खूप लक्षवेधी आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @iamaashvie या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच दहा हजाराहून अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: बापरे! फोटो काढण्यासाठी बिबट्याजवळ गेला अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप निरागस मुलगी”. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स” , तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “आतापर्यंतचा सर्वात सुंदर डान्स”, तर आणखी अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करुन कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील या गाण्यावरील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये बऱ्याच लहान मुलांनी सुंदर डान्स केलेला पाहायला मिळाला होता.

Story img Loader