मृत्यूचे भय हे प्रत्येकाला वाटतं असते मग तो माणूस असो की प्राणी. प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. प्राण्यांना स्वत:ला जगण्यासाठी शिकार करावी लागते पण इतरांची शिकार करणाऱ्या प्राण्यांनाही स्वत:च्या मृत्यूचे भय असतचं. सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी एकादा वाघ त्याच्या सावजावर नकळत हल्ला करतो तर कधी एखादा साप आणि मुंगस यांच्यातील लढाई पाहतो.

सध्या अशाच एका अजगराने केलेल्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका भल्या मोठ्या अजगराने एका हरणाला विळखा घातल्याचे दिसते आहे….हरणाला कितीही धडपड केली तरी अजगराच्या तावडीतून सुटका येत नाहीये पण तेवढ्यात असे काहीतरी घडते ज्यामुळे त्याचा जीव वाचतो.

Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Jungle Viral Video
‘भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही…’ दोन प्राण्यांमध्ये एका घासावरून भांडण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘नात्यात स्वार्थ जिंकतो’
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
Tiger cub found dead in Shivni forest area of ​​Tadoba Andhari Tiger Reserve buffer zone
चंद्रपुरात ४८ तासांत आणखी एका वाघाचा मृत्यू; ताडोबा बफरमधील…

हेही वाचा – चंद्रा गाण्यावर तरुणीने केला भन्नाट गरबा; व्हायरल डान्स व्हिडिओ एकदा पाहाच!…

व्हायरल व्हिडीओ millionairechapters नावाच्या अकांउटवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका अजगराने एका हरणाला त्याच्या विळख्यात घट्ट पकडले आहे. हरिण स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे तर अजगर त्याचा विळखा आणखी घट्ट करतो आहे. हरणाचा जीव जाणार तेवढ्यात कोणीतरी त्याच्य मदतीला येते. व्हिडीओमध्ये मदत करणारी व्यक्ती दिसत नाही पण कोणीतरी झाडाची फांदी घेऊन अजगराला मारताना दिसत आहे. मदत करणारी व्यक्ती घाबरत घाबरत हरणाला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश येते आणि अजगर विळख्यातून हरणाला सोडून देते आणि तेथून निघून जातो. विळख्यातून सुटताच हरिण कसाबसा उभा राहत तेथून पळ काढतो. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग पाहून लोक थक्क झाले आहे.

हेही वाचा – कहर! बिस्किटमध्ये बटाट्याची भाजी भरून महिलेने तळले भजी; Viral Video पाहून भडकले नेटकरी

हरणाच्या मदतीला जर कोणी आले नसते तर त्याने जीव गमावला असता पण कोणाच्यातरी दयाळूपणा आणि धाडसामुळे त्याचा जीव वाचला आहे. व्हायरल व्हिडीओ एका व्यक्तीने दुरून कारमध्ये बसून शुट केल्याचे दिसते. मदत करणारी व्यक्ती दिसत नसली तर लोकांनी त्याच्या धाडसाचे कौतूक केले आहे. लोकांनी व्हिडीओवर अनेक प्रतिक्रया दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया दिली की, “दोघंही स्वत:च्या जीवन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे” दुसऱ्याने म्हटले की, “ज्यांनी कोणी हरणाचे प्राण वाचवले त्याला सलाम!’

Story img Loader