आजकाल अनेक लोक ऑनलाइन फूड अॅपवरून अन्न ऑर्डर करतात. जेंव्हा त्यांना घरी स्वयंपाक करावासा वाटत नाही किंवा बाहेरचं काहीतरी खावंसं वाटत, तेंव्हा ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय निवडतात. पण ऑनलाईन ऑर्डर केलेलं जेवण पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध असते का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता आणखी एका डिलिव्हरी बॉयचा असाच किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही ऑर्डर केलेल्या जेवणात कोणी थुंकत तर नाही ना? असा प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकतो. हो कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय चक्क ऑर्डर केलेल्या जेवणावर थुंकताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये जे दिसत आहे ते खूपच धक्कादायक आहे. कारण आपल्यापैकी अनेकजण ऑनलाइन फूड प्लॅटफॉर्म आणि डिलिव्हरी बॉईजवर विश्वास ठेवततात जे घरपोच अन्न वितरण करतात. परंतु अशा घृणास्पद घटनांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जातो. व्हायरल झालेला व्हिडिओ फ्लोरिडामधील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथील एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेले अन्न घेऊन ग्राहकाच्या घरी गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी तो ऑर्डर घराबाहेर ठेवतो मात्र, ग्राहकने कमी टीप दिली म्हणून तो खूप चिडला आणि असं धक्कादायक कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

हेही वाचा- “स्वतःचा फोटो पाहून लाज वाटली..” एका फोटोमुळे बदललं महिलेचं आयुष्य, तब्बल ५० किलोहून अधिक वजन कमी केलं

किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद –

तर नाराज झालेल्या डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या जेवणाच्या ऑर्डवरती तीन वेळा थुंकून तेथून निघून गेल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. ही घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ ग्राहकाने सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट केला जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला ३ यूएस डॉलर्स म्हणजेच अंदाजे २५० रुपयांची टीप दिली होती, पण तरीही तो जेवणाच्या ऑर्डवर थुंकला.

कंपनीने कर्मचाऱ्याला कामावरून काढलं –

एका १३ वर्षाच्या मुलाने आणि त्याच्या आईने ही जेवणाची ऑर्डर दिल्याचे सांगितले जात आहे. तर डिलिव्हरी बॉयने केलेले हे घृणास्पद कृत्य करताना या दोघांनी घराच्या डोअरबेल कॅमेऱ्यातून पाहिलं होतं. शिवाय जेवण पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयला ३ अमेरिकन डॉलर्सची टीप दिली होती तरीही त्याने असे कृत्य केलं. डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डिलिव्हरी कंपनीने त्याला कामावरून काढून टाकल्याचंही सांगण्यात येत आहे.

Story img Loader