क्रिप्टोकरन्सीने जगात अनेक लोकांना रातोरात श्रीमंत केले आहे. त्याचबरोबर अनेकांना त्यांच्या आयुष्यभराच्या ठेवीही गमवाव्या लागल्या आहेत. आज आपण ज्या डिजिटल स्टारबद्दल बोलत आहोत, त्याने एका दिवसात क्रिप्टो मार्केट क्रॅशमध्ये २१ कोटींहून अधिक रुपये गमावले आहेत. कोट्यवधी रुपये गमावल्यानंतर तो नैराश्याचा बळी ठरला. ओलाजिदे ओलायंका विल्यम्स हा डिजिटल स्टार सोशल मीडियावर केएसआय म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने क्रिप्टो मार्केटमध्ये २.८ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २१ कोटींहून अधिक रुपये गमावले आहेत.
ब्रिटीश यूट्यूबर आणि रॅपर केएसआय याने क्रिप्टोकरन्सी लुनामध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये त्याचे मोठे नुकसान झाले आहे. केएसआयने सांगितले की मार्केट क्रॅशमुळे त्याचे सुमारे ३ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वास्तविक, २४ तासांत लुनाच्या स्टॉकच्या मूल्यात ९७ टक्के घसरण झाल्यामुळे हे घडले आहे. बाजारातील घसरणीमुळे इथरियम आणि बिटकॉइन सारख्या इतर अनेक क्रिप्टोकरन्सीच्या किमतींवरही परिणाम झाला आहे.
अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल
चोवीस तासात २१ कोटींहून अधिक रुपये गमावल्यानंतर युट्युबर केएसआय डिप्रेशनमध्ये गेला. तो म्हणाला की, ‘मी स्वत:ची खूप चांगली काळजी घेतली आहे.’ केएसआय पुढे म्हणाला, ‘काही हरकत नाही, मी अजून मेलेलो नाही. मी पैशापेक्षा आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना महत्त्व देतो. क्रिप्टो मार्केटने मला खूप काही शिकवले आहे.’
केएसआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, त्याने लुनाचे शेअर्स खरेदी केले होते, ज्यासाठी त्याने २.८ मिलियन डॉलर खर्च केले होते. मात्र आता त्याची किंमत ५० हजार रुपयांच्या खाली आली आहे.