सोशल मिडीयावर दररोज हजारो प्राण्यांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील बहुतांश व्हिडीओ कुत्र्यांचे असतात. लोक अनेकदा त्यांच्या पाळीव कुत्र्यांच्या हृदयस्पर्शी कृती सोशल मिडीयावर इंटरनेट वापरकर्त्यांसोबत शेअर करतात. सध्या असाच एक पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेला कुत्रा टॉवेल लटकवून नाचताना दिसत आहे. कुत्र्याचा नाचतानाचा हा मजेशीर व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतोय. हा व्हिडीओ आत्तापर्यंत अनेक लोकांनी पाहिला असून व्हिडीओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा कुत्रा गळ्यात गुलाबी टॉवेल लटकवून भिंतीवर उभा असल्याचे दिसत आहे. जेव्हा त्याचा मालक संगीत वाजवतो त्यानंतर तो मालकाच्या सांगण्यावरून नाचू लागतो. पुढचे दोन्ही पाय सतत हवेत ठेऊन, मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून, हा कुत्रा व्हिडीओमध्ये त्याच्या अप्रतिम डान्स मूव्हज दाखवताना दिसत आहे. ह्या कुत्र्याचा डान्स पाहण्यास अतिशय प्रेक्षणीय तसेच मजेदारही वाटतोय.

( हे ही वाचा: Viral Video: जेव्हा एक लहान मुलगी शिक्षकाविरोधात मोदींकडे करते तक्रार, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हा)

( हे ही वाचा: Viral Video: हत्ती ट्रक थांबवून करवसुली करतात का? वनाधिकाऱ्यानं विचारला मजेशीर प्रश्न)

कुत्र्याची हा रिल इन्स्टाग्रामवर animalgram13 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. पंजाबी तालावर नाचणाऱ्या या कुत्र्याच्या मनमोहक व्हिडीओला आतापर्यंत ७.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. तसंच ह्या व्हिडीओला ४०६ लाख लोकांनी लाईक्स केले असून ३ हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहे.

Story img Loader