सध्या सोशल मीडियावर माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला हे देखील माहित आहे की माणूस आणि कुत्रा यांच्यातील संबंध मैत्रीपेक्षा कमी नाही. माणसांचे कुत्र्यांशी वेगळे नाते आहे. अनेक वेळा मानव आणि कुत्रे एकमेकांसाठी जीवही धोक्यात घालतात.
२०० फूट उंचीवरून पडला कुत्रा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्यासोबत हायकिंगला गेला होता. हा माणूस त्याच्या ओनिक्स नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्यासोबत डेल्टा फ्लॅट परिसरात हायकिंगला गेला होता. त्यानंतर कुत्रा २०० फूट उंचीवरून डोंगरावरून खाली पडला. यानंतर त्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याचा शोध सुरू केला. त्यासाठी बचाव मोहीम राबवून हेलिकॉप्टरही मागवले.
(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)
लॉस एंजेलिसच्या काउंटी शेरीफ विभागाने त्या माणसाच्या पाळीव कुत्र्याचा शोध सुरू केला. रेस्क्यू टीमला अखेर कुत्रा सापडला. शेरीफ विभागाच्या म्हणण्यानुसार, टीमने रात्रभर कुत्र्याला शोधले. जो एका ठिकाणी रात्रभर अडकले होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध लागला. या शोधकार्याचा व्हिडीओही खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेस्क्यू टीम माणूस आणि कुत्र्याला त्याच्या मालकाची भेट करून देतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचेही मन प्रसन्न होईल.
(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा फुगा कुठे आहे?)
(हे ही वाचा: ट्रकने ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, भीषण अपघाताचा video viral)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. यामध्ये कुत्रा आणि त्याचा मालक एकमेकांना प्रेमाने एकमेकांना भेटत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ कोणाचेही मन जिंकेल.’ हेलिकॉप्टरने कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या रेस्क्यू टीमचेही अनेक यूजर्स आभार मानत आहेत.