Dog Viral Video: सोशल मीडियावर श्वानांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये प्राणी इतर प्राण्यांबरोबर भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी इतर प्राण्यांबरोबर खेळताना दिसत आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. दरम्यान, सध्या एका श्वानाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत.
श्वान असो किंवा मांजर हे दोन्ही पाळीव प्राणी अनेकांच्या घरात असतात. शिवाय आपल्या मालकाचे खूप लाडके असतात. प्रामाणिक प्राणी अशी श्वानाची ओळख आहे. या गुणाप्रमाणेच श्वान आपल्या मालकाशी नेहमी प्रामाणिक असतो. मालक घरात असल्यावर मालकाच्या अवती-भोवती फिरतो. तसेच मालकही श्वानाचे प्रत्येक लाड पुरवतात. एकूणच काय तर या दोघांचे बॉण्डिंग नेहमीच खूप खास असते. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली शाळेचा अभ्यास करत असून यावेळी तिच्या बाजूला तिचा पाळीव श्वानदेखील बसलेला दिसत आहे. यावेळी ती चिमुकली अभ्यासात मग्न असून श्वान तिच्या कुशीत येऊन बसतो आणि ती काय लिहितेय हे पाहतो. या दोघांचं हे क्युट बॉण्डिंग पाहून अनेक जण कौतुक करत आहेत.
हेही वाचा: ‘आई कोणाचीही असो…’ गोठ्यात रडणाऱ्या चिमुकल्याबरोबर गाईनं काय केलं ते पाहाच; VIDEO व्हायरल
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @littlelionbaby520 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अतूट मैत्री.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे नातं खूप गोड आहे.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “किती गोड डॉगी आहे.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप अनमोल क्षण.”