कधीकधी कामावर आपला दिवस कठीण जातो किंवा कोणीतरी आपल्याला दुखाते. अशावेळी आपण आनंदाचे काही छोटे क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे आपल्याला बरे वाटेल. यावेळी कुत्र्यांचे व्हिडीओ आपल्याला आधार देतात. हे गुबगुबीत, गोंडस प्राणी आपल्या लखलखत्या डोळ्यांनी आणि हलणाऱ्या शेपटीने कोणालाही हसवू शकतात. सध्या सोशल मीडियावर एका जर्मन शेफर्ड कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो आपल्या वडिलांच्या कार्यालयात दुपारचे जेवण पोहोचवण्यासाठी ददरोज चालत जातो. आम्हाला खात्री आहे की हा व्हिडीओ केवळ तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणार नाही तर यामुळे तुमचा उर्वरित दिवस देखील चांगला जाईल.
व्हिडीओच्या सुरुवातीला आपण पाहू शकतो की आपल्या वडिलांच्या कार्यालयात जाण्यासाठी हा कुत्रा रस्त्याच्या कडेने चालत निघाला असून त्याच्या तोंडामध्ये त्याने जेवणाचा डब्बा घट्ट पकडला आहे. व्हिडीओमध्ये टाकलेल्या कॅप्शननुसार, शेरू असे या कुत्र्याचे नाव असून तो दररोज सकाळी २ किमी चालत त्याच्या वडिलांना म्हणजेच त्याच्या मालकाला जेवण पोहोचवतो.
२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअॅक्शन व्हायरल
रस्ता सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, जेव्हा जेव्हा एखादे वाहन जवळ येताना दिसते तेव्हा तो रस्त्याच्या कडेला थांबतो आणि वाहनाला जाऊ देतो. कॅप्शन लिहिले आहे, “हे सुपर क्यूट नाही का?” सुमारे एक आठवड्यापूर्वी शेअर केल्यापासून या व्हिडीओला १० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि एक मिलियनहुन अधिक युजर्सनी त्याला लाइक केले आहे. एका युजरने लिहिले, “हे खूप सुंदर आणि मोहक आहे. त्याला रस्ता सुरक्षाही माहीत आहे. याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे.”