या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन कुत्रे आणि त्यांचा मालक आहे. त्यांच्या कृतीकडे बघून नेटीझन्सचे चांगलेच मनोरंजन होत आहे.इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालकाने त्यांच्या कुत्र्यांसारखा भुंकण्याचा आवज काढताच दोन कुत्र्यांच्या मानवी भुंकल्यावर दिलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघयला मिळतात. व्हिडीओ इन्स्टाग्राम पेज lifewithkleekai वर शेअर केला आहे जो कॉपर आणि स्काय नावाच्या कुत्र्यांना समर्पित आहे. “तुम्ही कोणाशी रिलेट केलं? क्रेझी कॉपर की चिल स्काय? ” व्हिडीओ शेअर करताना त्याने अशी कॅप्शन लिहली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

पलंगावर बसलेले कुत्रे आणि त्यांच्या समोर बसलेला त्यांचा मालक अशी या व्हिडीओची सुरुवात होते.काही क्षणातच मालक भुंकण्याचा आवाज त्यांच्या दिशेला बघून काढतो आणि कुत्रे भिन्न प्रकारे प्रतिक्रिया देतात. एक एकदम शांत बसतो तर दुसरा भुंकायला सुरुवात करतो.

पोस्ट, शेअर केल्यापासून आत्तापर्यंत ९,५०० हून अधिक लाइक्स व्हिडीओवर केल्या गेल्या आहेत आणि संख्या फक्त वाढत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ७४.२ हजार लोकांनी बघितलं आहे. व्हिडीओ बघून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

“स्कायचा चेहरा प्राईजलेस होता!” इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “या दोघांवर प्रेम करा … अशा विरोधाभासी व्यक्तिमत्त्वांवर!” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली. “स्कायला झोप आलीये बहुतेक” तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली. “मी विचार करतोय की स्काय काय विचार करत असेल?” असा प्रश्नही काहींनी कमेंटमध्ये लिहला.

व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला कशी वाटली दोन्ही कुत्र्यांची प्रतिक्रिया?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dogs reacted as soon as the owner barked you too will laugh while watching this hilarious video ttg