‘ऑर्डर केल्यानंतर ३० मिनिटांत घरपोच पिझ्झा आणि उशीर झाल्यास तो मोफत’ अशी आकर्षक जाहिरातबाजी करणारं ‘डॉमिनोज’ हे नाव आपल्याला चांगलंच परिचयाचं झालं आहे. पिझ्झाची सामान्य भारतीयांना ओळख करून दिली ती डॉमिनोजने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पिझ्झा बनवणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ब्रँड आहे. आज जगभरात डॉमिनोजची १३ हजारांहून अधिक आउटलेट्स आहेत.
कोणत्याही ब्रँडचा लोगो हा सर्वात आकर्षणाचा विषय असतो. या लोगोचा वेगळा अर्थ असतो किंवा त्याच्या निर्मितीमागची एक कहाणी असते जी फार कमी लोकांना ठाऊक असते. डॉमिनोजही त्याला अपवाद नाही. निळ्या-लाल रंगाचे दोन चौकोन आणि त्यात पांढऱ्या रंगाचे तीन ठिपके असा साधारण डॉमिनोजचा लोगो आहे. पण १ दुकानापासून ते १३ हजार आउटलेट्सपर्यंतचा पल्ला गाठणं काही सोपी गोष्ट नव्हती.
Viral : चलनी नोटा कापून वही सजवणारी मुलगी आहे तरी कोण?
त्यासाठी अखंड मेहनत हवी होती आणि याचीच आठवण करून देण्यासाठी डॉमिनोजच्या लोगोमध्ये तीन ठिपक्यांचा समावेश करण्यात आला.
टॉम मोनॅगन आणि जेम्स मोनॅगन या दोन भावंडाने १९६० च्या सुमारास पिझ्झाचं एक दुकान सुरू केलं. बघता बघता या दोन्ही भावांचा व्यवसाय चांगलाच नावारूपास आला. दोन्ही भावांची आर्थिक स्थिती सुधारु लागली, पण आलिशान कार घेण्याच्या मोहापायी जेम्स मोनॅगनने याने दुकानाचे हक्क आपल्या भावाला विकले आणि तो व्यवसायातून बाहेर पडला. त्यावेळी डॉमिनोजचं नाव ‘डॉमिनिक्स’ असं होतं. जेम्स व्यवसायातून बाहेर पडल्यानंतरही टॉमने आपला व्यवसाय सुरूच ठेवला, पुढे डॉमिनिक्स इतकं प्रसिद्ध झालं की टॉमने आणखी दोन आउटलेट सुरू केली. हे टॉमच्या दृष्टीने सर्वात मोठ यश होतं.
जाणून घ्या ‘आयफोन X’ मुळे कशी होते सॅमसंगची चांदी
१९८३ पर्यंत डॉमिनोज पिझ्झाची १००० आऊटलेट्स जगभर पसरली. डॉमिनोजसाठी आकर्षक आणि तितकाच अर्थपूर्ण लोगो तयार करण्याच्या टॉम विचारात होते. तेव्हा त्यांनी तीन ठिपके असलेला लोगो तयार करून घेतला. टॉमने पहिलं आउटलेट भावासोबतचं सुरू केलं, अल्पावधीत एकाचे तीन पिझ्झा आउटलेट होणं ही देखील टॉमसाठी खूपच महत्त्वाची गोष्ट होती. त्या तीन दुकानांची आठवण कायमस्वरूपी लक्षात राहावी यासाठी त्याने आपल्या लोगोवर तीन ठिपके देण्याचा निर्णय घेतला. तसेच लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी गडद लाल, निळा व शुभ्र पांढऱ्या रंगाचाही वापर लोगोची निर्मिती करताना केला.