सध्या विमान प्रवासाबाबतच्या अनेक चांगल्या वाईट घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता एक विमान उड्डाण करत असताना अचानक विमानाचा दरवाजा उघडल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक विमान उड्डाण करत असताना अचानक दरवाचा उघडल्यामुळे विमानातील २५ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा जीवाला धोका निर्माण झाला होता. या विमानाने जगातील सर्वात थंड प्रदेश असलेल्या मगन नावाच्या ठीकाणाहून उड्डाण केल्याची माहिती समोर आली आहे. विमानाचा दरवाचा उघडला त्यावेळी त्या ठिकाणचे तापमान -४१ अंश सेल्सिअस होतं असंही सांगण्यात येत आहे.
‘द मिरर’च्या वृत्तानुसार, एयरो अँटोनोव्ह-26 विमानाने (AN-26 plane) ९ जानेवारी रोजी रशियाच्या याकुतियाच्या सायबेरियन प्रदेशातील मगन येथून या विमानाने उड्डाण केले होते, तर हे विमान मगदानला जाणार होते. याचवेळी अचानक विमानाचा दरवाजा उघडल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर विमानातील एका प्रवाशाने या सर्व धक्कादायक घटनेचा थरार आपल्या मोबाईच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही पाहा- Video: कारला रस्ता देण्यासाठी जेसीबी चालकाचं भलतंच धाडस, भररस्त्यात JCB वर उचलला अन्….
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचा उघडलेला जो दरवाजा होता, तो माल चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी वापरला जाणारा होता. दरवाजा उघडताच वेगवान वाऱ्यामुळे विमानातील पडदे आणि सामान उडायला लागल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. तर कडाक्याच्या थंडीमुळे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आपत्कालीन परिस्थिती पाहून वैमानिकाने मगनमध्ये विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरवलेही.
हेही पाहा- Video: दाट धुक्यातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या चालकाने केबिनमधून दाखवलेला अद्भुत नजारा पाहाच
दरम्यान, एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. मात्र, विमानातील काही लोकांच्या टोप्या उडाल्या शिवाय अनेक प्रवाशांचे सामानही खाली पडल्याची माहिती समोर आली आहे.112 न्यूज आउटलेटने या विमानात घडलेल्या घटनेचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये थंडीमुळे विमानातील प्रवाशांची प्रकृती बिघडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर विमानातील एक व्यक्ती उडून बाहेर गेली असती. मात्र, सुदैवाने ती बाहेर जाण्यापासून बचावल्याचा थरारक अनुभवही एका प्रवाशाने या व्हिडिओमध्ये सांगितला आहे.