Viral Video : असे अनेक खेळ आहेत जे आपण पूर्वी खेळायचो पण आता अजिबात खेळत नाही. काही खेळ तर काळाच्या पडद्याआड गेले आहे. आंधळी कोशिंबीर, लगंडी, डपचर, भातुकली, साखळी, लगोरी, आईचं पत्र हरवलं, भोवरा, गोट्या, खेचा खेची, चोर चिठ्ठी, कांदाफोडी इत्यादी खेळ आज क्वचितच खेळताना दिसतात. अशातच एक खेळ म्हणजे फुली गोळाचा खेळ. या खेळावरून व्यक्तीची बौद्धिक क्षमता ओळखली जाते.
फुली-गोळाचा खेळ हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. जरी हा खेळ काळाच्या पडद्याआड गेला असला तरी अनेक जण वेळ मिळेल तसा फुली गोळाचा खेळ खेळताना दिसतात. तुम्ही खडू किंवा पेनाने फुली-गोळाचा खेळ खेळला असाल पण तुम्ही कधी जेसीबीने फुली-गोळ्याचा खेळ खेळला आहात का? तुम्हाला वाटेल, हे कसं काय शक्य आहे? पण हे खरंय. एक जेसीबीचालक चक्क रस्त्यावर फुली गोळ्याचा खेळ खेळताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
खडू किंवा पेनाने नव्हे तर चालक चक्क जेसीबीने खेळतोय फुली-गोळाचा खेळ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जेसीबीचालक चक्क रस्त्यावर जेसीबीच्या मदतीने फुली-गोळाचा खेळ खेळताना दिसत आहे. हा चालक जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर खुणा करताना दिसत आहे. कदाचित या जेसीबीचालकाला फुली-गोळ्याचा खेळ आवडत असेल त्यामुळे मोकळा वेळेत हा चालक खेळ खेळतोय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “काम नंतर आधी खेळून घेऊ” फुली-गोळ्याचा खेळ खेळणाऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडेल.
हेही वाचा : Pune : रस्त्याच्या मधोमध नव्हे तर बसस्टॉपच्या कडेला लावा बस, PMT बसचालकांना केली विनंती, पाहा VIDEO
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
shetkari.1_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “चला काहीतरी चांगल बघितलं आज” तर एका युजरने लिहिलेय, ” जमलं तुम्हालाच चालक मालक संघटना” आणखी एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर…फुल एन्जॉय” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक लोक मनोरंजनासाठी असे व्हिडीओ बनवत असतात.