एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू आलं, तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी कमावलं, हे वाक्य आपण अनेकवेळा ऐकलं आहे. एखाद्या गरजूला मदत करण्यासारखं पुण्य अन्य कशातही नाही, असंही आपण म्हणत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बस चालकाचं कृत्य पाहून तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. सोशल मीडियावर एका बस चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दोन लहान मुलांना खाऊ देताना दिसत आहे.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे नेटकऱ्यांची मने जिंकतात. शिवाय नेटकरी आवडलेले व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करत असतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक बसचालक रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन मुलांना खाऊ देताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांनी या ड्रायव्हरच्या कृतीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
मन जिंकणारा व्हीडीओ –
हेही पाहा- Viral Video: सायकलस्वाराचा आत्मविश्वास पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले “आयुष्यात एवढं बिनधास्त…”
व्हायरल होत असणारा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील एका पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मल्याळम भाषेत काही कॅप्शन ही देण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये बस चालक दोन लहान मुलांना बिस्किटं आणि स्नॅक्सची पाकिटं देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बस चालकाने दिलेला खाऊ घेतल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत.
हेही पाहा- Video: मासेमारी करणारा पर्यटकच झाला शिकार; माशाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण…
हा व्हिडिओ आतापर्यंत १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, नेटकऱ्यांनी बस चालकाच्या दयाळू वृत्तीचे कौतुक केले आहे. शिवाय ‘या ड्रायव्हरच्या कृतीतून अनेकांनी धडा घ्यावा,’ असंही एका युजर्ने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर अनेकांनी ‘हा ड्रायव्हर रिअल लाइफ हिरो’ असल्याचंही म्हटलं आहे.