Shocking video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सिंहाची शिकार झालेली तुम्ही कधी पाहिलीये का? हो तुम्ही बरोबर ऐकताय एका गरुडानं सिंहाची शिकार केल्याचा खतरनाक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे.
असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. अशाच एका गरुडानं चक्क सिंहाला उचलून हवेत उडवलं आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ एडिटेड आहे. .मात्र हा व्हिडीओ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.
होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच. सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सिंहाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हा प्राणीही किती चपळ आहे याचा अंदाज आपल्याला आहे मात्र या प्राण्याची चपळताही गरुडाच्या ताकदीपुढे फेल गेली. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गरुडची झेप पाहून अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गरुड आपल्या पंजामध्ये भल्या मोठ्या प्राण्याला घेऊन उंच आकाशात झेप घेत आहे. जमीनीवर असणारा हे प्राणी कितीही शक्तीशाली प्राणी असुद्यात मात्र त्याला चकवा देऊन पसार होतोच. मात्र गरुडाच्या ताकदीलाही विसरुन चालणार नाही. अशा प्राण्याला गरुडानं संधी साधत शिकार केली आणि त्याला पकडून उंच आकाशात झेप घेतली. त्यानंतर तु्म्ही पुढे व्हिडीओमध्ये पाहू शकता का गरुडाने सिंहाला १ हजार फूट उंचावर नेलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर heavenly_nature_1 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन आहे – गरुड सिंह घेऊन जात आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “म्हणून कुणालाच कमी समजू नका” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले होते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… गरुडाची ताकद माहिती असताना सिंहानं त्याला हलक्यात घेतलं असेल असं दिसत आहे.” तर काहींनी हा व्हिडीओ फेक, AI जनरेटेड आहे असं म्हंटलंय.