मंगळवारी १० मे रोजी संध्याकाळी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्रकिनाऱ्यावर अचानक सोन्याचा रथ प्रकट झाल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. समुद्रातून अगदी सोन्यासारखा दिसणारा हा रथ किनारऱ्याच्या दिशेने पुढे सरकत होता. लोकांची नजर या रहस्यमयी रथावर पडताच त्यांनी तो रथ दोरीच्या साहाय्याने किनाऱ्यावर आणला.
सुन्नापल्ली किनाऱ्यावर असणाऱ्या स्थानिक लोकांनी दोरीच्या साहाय्याने रथाला समुद्राच्या किनाऱ्यावर आणले. हा रथ अगदी सोन्याने तयार केल्यासारखा भासत होता. तथापि, अद्याप कोणालाही हे कळत नाही आहे की हा रथ कुठून वाहत आला आहे. मात्र असा अंदाज बांधण्यात येत आहे की हा रथ दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून कोणत्यातरी मठातून वाहत आला असू शकतो. एका रिपोर्टनुसार, चक्रीवादळामुळे हा रथ समुद्रात उडून सुन्नापल्ली किनार्याजवळ पोहोचला असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर
स्थानिक नाविकांनी असे अनुमान लावले आहे की, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या लाटांमुळे रथ किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागला असावा आणि स्थानिक लोकांनी तो पाहिला, म्हणून त्याला दोरीने बांधून किनाऱ्यावर आणले. दरम्यान सोन्याचा रथ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने तिथे हजार झाले होते. लोकांसाठी हा रथ एक कुतूहलाचा विषय बनला आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे, म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशिया यांसारख्या अंदमान समुद्राच्या जवळच्या देशातून लाटांमुळे हा रथ वाहत सुन्नापल्ली किनाऱ्यावर आला असावा. मात्र, अद्याप हा फक्त एक अंदाजच आहे.
आशियानेट न्यूजच्या रिपोर्टनुसार, हे रथ एका मंदिराच्या आकाराचा आहे आणि हे दिसायला अगदी भव्य असून सोन्यासारखे दिसते. ही बातम्या वाऱ्यासारखी पसरली अजून लोकांमध्ये धार्मिक भावनेचा संचार झाला आहे. यामुळेच शेकडो लोक हा रथ पाहायला घटनास्थळी पोहोचले आहेत. याची वास्तुकला प्राचीन संरचनांसोबत मेळ खाते. तथापि, अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.