वय हा केवळ एक आकडा आहे. खरंतर कोणत्याही वयात आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारी वृद्ध महिला याचेच एक उत्तम उदाहरण आहे. साजिदा खान नावाच्या महिलेने गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला असून तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साजिदा यांनी गोविंदाचे लोकप्रिय गाणे ‘किसी डिस्को में जाए’ या गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी डान्स करतानाचे त्यांचे हावभाव आणि स्टेप्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये साजिदा सलवार सूट घालून डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. साजिदा यांचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख फॉलोवर्स आहेत. त्या दररोज आपल्या डान्सचे व्हिडीओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

हातातच रॉकेट पेटवणाऱ्या टवाळ पोरांना चांगलीच अद्दल घडली! अशी फजिती झाली की…

साजिदा यांना त्यांच्या व्हिडीओवरून अनेकदा ट्रोलही केले जाते. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना म्हटलं आहे की त्यांनी या वयामध्ये नमाजचे पठण करावे. दरम्यान, डान्स करत असताना साजिदा यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो. त्यांनी या व्हिडीओमध्ये हुबेहूब गोविंदासारखेच हावभाव आणि स्टेप्स केल्या आहेत.

फायर हेअरकट करणं तरुणाच्या जीवावरच बेतलं; Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

साजिदा यांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ७० हजारांहूनही अधिकवेळा पाहिला गेला आहे. त्यांचा उत्साह पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. त्यांच्या उत्तम डान्स स्टेप्सचे कौतुक झाले. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये साजिदावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहलंय, “तुमच्या सुंदर हावभाव आणि स्टेप्सने आमचे मन जिंकले आहे.” दुसऱ्या युजरने लिहले, “काकू तुम्ही खूपच ग्रेसफुल आहात. तुम्हाला पाहून मी नेहमीच थक्क होतो. खूप प्रेम”