स्ट्रेट टाइम्सच्या अहवालानुसार, दक्षिण चीनमधील युनान प्रांतातील मेंगमन टाउनशिपमधील जंगलात फिरणाऱ्या एका जंगली आशियायी हत्तीला २.८ 2.8 किलो अफूची पिशवी सापडली. याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चार वन्य हत्तींना गावापासून दूर नेले जात असल्याचे दिसते आहे. त्यापैकी एका हत्तीला एका पिशवीचा वास आला. पोलिसांनी ती पिशवी नंतर ताब्यात घेतली.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक हत्तींचा कळपातून वेगळा होतो आणि एका काळ्या पिशवीच्या जवळ जातो. आपल्या सोंडने तो त्या पिशवीचा वास घेतो. पोलिस तिथे आधीपासूनच उपस्थिती असतात. पोलिस पिशवीची तपासणी करण्यापूर्वी जंगली हत्तींना तेथून पुढे जाऊ देतात. फुटेजमझ्ये दिसते की, पोलिस बॅग खोलत आहे आणि कपड्यांच्या खाली त्यांना एक डॅग्रचे पॅकेट सापडते.
हेही वाचा – हाजमोला चहाचा Viral video पाहून चहाप्रेमीं झाले नाराज, म्हणाले ”चहाचा अपमान…”
पोलिसांचा तपास सुरू आहे.
जंगली हत्ती अंमली पदार्थ टाकत असल्याच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “ज्या स्टुडिओने तुमच्यासाठी कोकेन बीअर आणली, तेथून कोकेन हत्ती आला आहे.”
दुसर्या वने विनोद केला, “कोकेन बियर, ओपीयम एलिफंटचा नवीन सिक्वेल.” तिसऱ्याने लिहिले, “हत्ती हे पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहेत.” चौथ्याने लिहिले, “तो एक बदमाश हत्ती आहे.” पाचव्याने लिहले की, “ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांसाठी वाईट दिवस.”