Viral Video: समाजमाध्यमांवर सातत्याने अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. असे विविध विषयांवर आधारित व्हायरल झालेले व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचे, पक्षांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी त्यांचे भयानक रूप पाहायला मिळते तर कधी त्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणीपुरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पाणीपुरीच्या आंबट, गोड आणि तिखट पाण्याची चटक महिलांपासून अगदी लहानग्यांनाही असते. आजपर्यंत सोशल मीडियावर पाणीपुरीचे चाहते असणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक हत्ती पाणीपुरी खाताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावर पाणीपुरीच्या स्टॉलवर पाणीपुरी खाण्यासाठी चक्क एक हत्ती येतो, यावेळी पाणीपुरीवाला त्याला एका मागे एक पाणीपुरी खायला देतो. हत्तीदेखील प्रत्येक पाणीपुरीचा घास मोठ्या आनंदाने खातो. हत्तीचा हा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘गाईने थेट धडक मारून महिलेला उडवलं…’ पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ghantaaया अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरने लिहिलंय, “ही नक्कीच हत्तीण असेल, म्हणून हिला पाणीपुरी खायला आवडते.” दुसऱ्या युजरने लिहिलंय, “भावा, हत्तीसाठी अजून थोडं तिखट बनव.” आणखी एकानं लिहिलंय, “गजराजला राग आला तर तो सगळ्या स्टॉलवरची पाणीपुरी खाईल.” आणखी एकानं लिहिलंय, “हत्तीला म्हणावं फास्ट फूड कमी खा, नाहीतर वजन वाढेल.”