भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ आज (१४ जुलै) दुपारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील तळावरून अवकाशात झेपावलं आहे. हे चांद्रयान अवकाशात झेपावताच देशभरातील लोकांनी जल्लोष सुरु केला आहे. तर अनेकांनी या इस्रोच्या वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन केलं आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणीदेखील चांद्रयान – २ मोहिमेच्या अपयशामुळे भावुक झालेले इस्रोच्या वैज्ञानिकांना कोणीही विसरलेलं नाही. कारण सध्या चांद्रयान २ मोहिमेदरम्यानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इस्रोचे प्रमुख भावूक झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींना मिठी मारून रडत असल्याचं दिसत आहेत.
७ सप्टेंबर २०१९ रोजी संपूर्ण देश चांद्रयान २ चंद्रावर यशस्वीपणे उतरण्याची वाट पाहत होता. इस्रोच्या वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः श्रीहरीकोटा येथे पोहोचले होते. सर्व काही ठीक चालले होते पण शेवटच्या काही क्षणात चांद्रयानाशी संपर्क तुटल्याची घोषणा खुद्द इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी केली होती. या सर्व घटनेनंतर जेव्हा पंतप्रधान मोदी तेथून निघाले तेव्हा त्यांना भेटायला आलेले इस्रोचे प्रमुख भावूक झाले आणि पंतप्रधान मोदींना मिठी मारून रडू लागले.
Chandrayaan 3 Launch: असं झालं चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा Video!
२०१९ मधील व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल –
चांद्रयान-२ शी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशातील जनतेची खूप निराशा झाली होती. यावेळी पंतप्रधान मोदींना सोडायला आलेले आलेले इस्रोचे प्रमुख के. सिवनही भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांना मिठी मारली, यावेळी सिवन यांना अश्रू अनावर झाले होते. आज चांद्रयान -३ चे यशस्वीरिच्या उड्डाण झाले. मात्र देशातील जनता २०१९ मधील चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशामुळे भावुक झालेले इस्रोच्या वैज्ञानिकांना विसरली नसल्याचं दिसत आहे. कारण अनेकांनी २०१९ मधील व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांना दिलं होतं प्रोत्साहन –
चांद्रयान -२ च्या अपयशानंतर पीएम मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले, “मी पाहत होतो जेंव्हा चांद्रयानाचा संपर्क तुटला त्यावेळी वैज्ञानिकांचे चेहरे पडले होते, पण तुम्ही लोकांनी जे केले ते काही छोटी गोष्ट नव्हती. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. तुमची मेहनत खूप काही शिकवून गेली. शिवाय पीएम मोदींनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, “मित्रांनो, निकाल आपल्या समोर आहे, परंतु मला आणि संपूर्ण देशाला आमच्या वैज्ञानिक, अभियंते, तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मी तुम्हाला काल रात्रीही सांगितले होते आणि आता पुन्हा सांगत आहे, मी तुमच्यासोबत आहे, देशही तुमच्यासोबत आहे. मोदी पुढे म्हणाले, “आज भलेही काही अडथळे आले असतील, परंतु यामुळे आमचे मनोबल कमी झालेले नाही, तर आम्ही आणखी मजबूत झालो आहोत. आज, कदाचित शेवटच्या टप्प्यावर आपल्या मार्गात अडथळा आला असेल, परंतु त्याने आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त केलेले नाही.”