Viral Video : महामार्गावरून प्रवास करत असताना तुम्हाला काही ठिकाणी वाहन थांबवून टोल द्यावे लागतात. पण, टोलनाक्यावर गाड्यांची प्रचंड रांग लागलेली असते. यामुळे टोल नाक्यावर टोल भरण्यास जास्त वेळ लागतो. हे पाहून काहीजण टोल नाक्यावर पैसे न भरताच पुढे निघून जातात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. टोल नाक्यावर पैसे न देता निघून जाणाऱ्या ट्रकचालकाकडून टोल घेण्यासाठी कर्मचारी मजेशीर पद्धतीने पाठलाग करताना दिसून आला आहे.
व्हायरल व्हिडीओ ट्रकचालक आणि टोलनाक्यावर टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आहे. टोलनाक्यावर पैसे न देता एक ट्रकचालक निघून जातो. हे बघताच टोल घेणारा कर्मचारी चालत्या ट्रकवर चढतो. ट्रकचालक वेगात ट्रक घेऊन जातो आहे आणि कर्मचारी ट्रकच्या दरवाजावर लटकताना दिसत आहे. टोल घेणारा कर्मचारी ट्रक चालकास गाडी बाजूला थांबवण्यास सांगतो आहे, पण ट्रकचालक त्याचं ऐकत नाही आणि दादागिरी करण्यास सुरुवात करतो आणि त्यांचा मजेशीर संवाद रंगतो. टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि ट्रकचालकाचा मजेशीर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
हेही वाचा… धक्कादायक! गुजरातमध्ये आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू, घटनेचा VIDEO व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
टोल घेण्यासाठी चढला चालत्या ट्रकवर :
एक टोल कर्मचारी ट्रकचालकाच्या गाडीला लटकून त्याच्याकडे टोल देण्याची मागणी करताना दिसून येत आहे. टोल मागणारा कर्मचारी ट्रकचालकाला गाडी थांबवण्यास सांगतो; पण ट्रकचालक त्याच्या गाडीवर कर्मचारी चढला म्हणून तुझ्या बापाची गाडी आहे का? तू गाडीला लटकून चोरी करण्याचा प्रयत्न करतो आहेस का? तुझा व्हिडीओ बनवू का मी… अशा शब्दात ट्रकचालक टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ऐकवताना दिसून येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरून अनेक मजेशीर व्हिडीओ नेहमीच शेअर केले जातात. तर आता टोल न देणारा ट्रकचालक आणि टोल घेण्यासाठी ट्रकला लटकणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण टोल कर्मचारी आहे की, बँकेचा रिकव्हरी एजेंट आहे असे म्हणताना दिसत आहेत. तर अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.