सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ तर वेगाने व्हायरल होत असतात. जंगलाचा राजा सिंह याच्या शौर्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले आणि पाहिले असतील. सिंहाचा जंगलात एक वेगळाच थाट असतो. पण कधी कधी या राजाला अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून असाच एक प्रकार समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सिंहाचे डोके एका डब्यात अडकलेले दिसत आहे. डोके अडकल्यामुळे सिंहाला काय करावं कळत नाही आणि इकडे तिकडे पळू लागतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही प्राणीप्रेमी संतापले आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्राणीसंग्रहालयात काही सिंह दिसत असल्याचे दिसत आहे. त्या सिंहांपैकी एका सिंहाचे तोंड प्लास्टिकच्या डब्यात कसे अडकते हे कळत नाही. तोंडात अडकल्यानंतर सिंहाला काकुळतीला येतो आणि इकडेतिकडे पळू लागतो. व्हिडीओच्या शेवटपर्यंत सिंह अडकलेले तोंड बाहेर काढू शकत नाही.
हा व्हिडीओ आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला हजारो लोकांनी लाइक्सही केले आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हिडीओ पाहून काही लोक हसत आहेत. तर काही प्राणीप्रेमी प्राणीसंग्रहालयातील असा निष्काळजीपणा पाहून नाराजी व्यक्त करत आहे.