आई आणि मुलाचं नातं फार वेगळं असतं, तसंच वडील आणि मुलाचं नातं देखील सर्वांत खास असतं. आपल्या समाजात अशा अनेक बाप-लेकांच्या जोड्या आहेत जे अगदी मित्रांसारखे राहतात. वडीलच मुलांच्या प्रत्येक गरज ओळखतात आणि त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. याच अनोख्या नात्यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल झालेला व्हिडीओ नक्कीच तुमचं मन जिंकेल. एका व्यक्तीने आपल्या लहान मुलासाठी खास लाकडी कार (Wooden Car) बनवली आहे. ही कार बनवून तयार झाल्यानंतर त्याने ती आपल्या मुलाला भेट म्हणून दिली. ज्या पद्धतीने या व्यक्तीने कार बनवली आहे ते बघून आपण नक्कीच आश्चर्यचकित होऊ. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो, या व्यक्तीने आपल्या कौशल्याच्या जोरावर ही आकर्षक कार तयार केली आहे. ही कार पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की फक्त एक शोभेची वस्तू म्हणून ही कार तयार केली गेली असावी. परंतु ही कार रस्त्यावर चालते आहे हे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो. ही कार बघितल्यावर कोणालाही वाटणार नाही की ही कार लाकडाचा वापर करून बनवली आहे.

Viral Video : आता शाकाहारी लोकांनाही खाता येणार मासे; सोशल मीडियावर व्हायरल होतेय Vegetarian Fish Fry Dish

Viral Video : बर्फवृष्टीमुळे रस्ते झाले बंद; थेट JCB घेऊन नवरदेव पोहचला मांडवात

फक्त ६८ दिवसात तयार केली कार

व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला कळेल की ही कार अगदी खऱ्या कारसारखीच आहे. या कारमधील सगळ्या वस्तू ऑटोमॅटिक आहेत. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘मुलावरील प्रेम आणि अप्रतिम कौशल्याच्या जोरावर या व्यक्तीने केवळ ६८ दिवसात बनवली वूडन कार (Wooden Car). मुलासाठी खास भेट.’ असे त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहले आहे. आतापर्यंत ३९ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.