मुंबई म्हणजे गर्दीने गजबजलेलं शहर. हे शहर कधीही थांबत नाही. रात्रंदिवस मेहनत करत असलेल्या मुंबईकरासाठी मुंबई लोकल ही अतिमहत्त्वाची आहे. या लोकलमध्ये रोजच कोणते ना कोणते किस्से घडत असतात. या लोकलमध्ये प्रवाशांची सीटवरून होणारी भांडणं तुम्ही पाहिलीच असतील. आता मुंबई लोकलप्रमाणेच मेट्रोमध्येही गर्दीचे प्रमाण वाढू लागले आहे.

मात्र दिल्लीच्या मेट्रोमध्येही काही वेगळे चित्र नाही. येथील लोकांनाही मेट्रोमधून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा लोक जागेवरून भांडतानाही पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रोमधील दोन महिला बसण्याच्या जागेवरून भांडताना आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

चिमुकल्याने गायलेलं गोंडस राष्ट्रगान ऐकून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध; हा Viral Video एकदा पाहाच

गेल्या महिन्यात दोन वयस्कर व्यक्तींचा बसच्या सीटवरून भांडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावेळी एकजण म्हणत होतं “बहुत जगह हैं” तर दुसरी व्यक्ती म्हणत होती “नाही जगह हैं.” त्यांनी बोललेल्या वाक्यांवरून अनेक रील्सही बनवले गेले आहेत. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी या भांडणाला “अरे बहुत जगह हैं”चं फीमेल व्हर्जन म्हणत आहेत.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, मेट्रोमध्ये शिरल्यानंतर एक महिला बसण्यासाठी जागा शोधत असते. यावेळी रिकाम्या सीट्सवर एका महिलेने आपली बॅग ठेवल्याचे तिला दिसते. या महिलेने बसलेल्या महिलेला आपली बॅग उचलण्यास सांगितले. मात्र त्या महिलेले यासाठी नकार दिला. यावर राग आल्याने उभी असलेली महिला तिच्या बाजूलाच जाऊन बसते.

क्षुल्लक कारणावरून ‘या’ महिलेने ९० सेकंदांत रिक्षाचालकाला मारल्या १७ थप्पड; Viral Video पाहून तुम्हालाही येईल राग

अपलोड झाल्यापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader