सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, एका लाइव्ह टीव्ही कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेले पाहुणे आपापसातच भांडू लागले. त्यांचे हे भांडण इतके वाढले की त्यांच्यात मारामारीसुद्धा झाली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून आजच्या युगात काहीही शक्य आहे, असे आपण म्हणू शकतो. व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका लाइव्ह डिबेट कार्यक्रमावेळीचा असल्याचा दिसत आहे.

Viral Video : आता शाकाहारी लोकांनाही खाता येणार मासे; सोशल मीडियावर व्हायरल होतेय Vegetarian Fish Fry Dish

Viral Video : ‘या’ लहान मुलांचा बँड जिंकतोय लोकांची मनं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

@AalokTweet नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले आहे, ‘खरोखरच हा खतरनाक व्हिडीओ आहे.’ तर दुसऱ्याने म्हटले आहे, ‘अतिशय धक्कादायक व्हिडिओ. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर टीव्ही पाहावासा वाटत नाही.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fight started in the live debate video viral pvp