Viral Post : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस या पुस्तकामध्ये माणसांच्या उत्तम कामगिरी आणि नैसर्गिक जगाच्या जागतिक विक्रमांची नोंद करण्यात येत असते. जगातली महागडी किटली असो किंवा जगातली सगळ्यात मोठी मांजर असो या सगळ्यांची नोंद या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये केली जाते. तर, आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे; जी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस हे एक पुस्तक आहे; जे दरवर्षी प्रकाशित होते. २०१५ साली या पुस्तकाची ६१ वी आवृती प्रकाशित करण्यात आली होती. तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसच्या कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर १९८ पृष्ठांची पहिली आवृत्ती २७ ऑगस्ट १९५५ रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस म्हणून प्रकाशित करण्यात आली होती. हीच खास गोष्ट त्यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितली आहे आणि पहिल्या आवृत्तीची एक खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, एक हिरव्या रंगाचे पुस्तक आहे आणि त्यावर ‘द गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्’ असे लिहिण्यात आले आहे. एकदा बघाच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसची पहिली आवृत्ती …
पोस्ट नक्की बघा :-
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् (Guinness World Records) यांच्या अधिकारीक ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे आणि त्यांनी कॅप्शनमधून स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात लिहिले आहे की, या दिवशी १९५५ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. अनेक जण ही पोस्ट बघून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् यांना कमेंटमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत; तर काही जण ही आवृत्ती पासपोर्टसारखी दिसत आहे, असे म्हणत आहेत. तर अनेक जण यात तुम्ही नोंदवलेला पहिला रेकाॅर्ड कोणता होता, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत.