आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. अशा घटनांमध्ये लोकांना परदेशात नोकरीच्या ऑफर्स किंवा पार्ट टाईम जॉब देण्याचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. पण सध्या एका मुलीने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांला असा धडा शिकवला आहे की, तो भविष्यात कोणाची फसवणूक करताना १० वेळा विचार करेल यात शंका नाही.
फसवणूक करणाऱ्याला शिकवला धडा –
काजल नावाच्या मुलीने एका फसवणुकदारासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्या चॅटमध्ये काजलला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत जॉब ऑफर देण्यात आली होती. शिवाय एका दिवसात ७ रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते, असेही तिला सांगण्यात आले होते. मात्र ही ऑफर फसवणुकीचा प्रकार असल्याचं तिला संशय येताच तिने समोरच्या व्यक्तीला “मी आत्महत्त्या करणार आहे” असा मेसेज पाठवते ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला धक्का बसला, पण तरीही नंतर सायबर चोर म्हणतो की, तुम्ही मला फक्त पाच मिनिटे द्या, मी तुम्हाला संपूर्ण ऑफर समजावून सांगतो. यावर ती मुलगी मी आत्महत्या करणार आहे, त्यामुळे मी या पैशाचे काय करू? असा मेसेज करते.
हेही वाचा- एका उंदरामुळे थांबवली ट्रेन; डब्यातून धूर निघताच प्रवाशांचा गोंधळ, धक्कादायक घटना व्हायरल
व्हायरल चॅटमध्ये काय लिहिलं आहे?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चॅटमध्ये एक वेळ अशी येते जेव्हा फसवणूक करणारा मुलीला सल्ला देतो की, “आयुष्य संपवून काहीही होणार नाही. तुम्ही स्वतःसाठी जगले पाहिजे, दुसऱ्यासाठी नाही.” यावर मुलगी म्हणते की, “माझे आता स्वतःवर प्रेम नाही” असं म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही वेळाने फसवणूक करणारा पुन्हा मेसेज करतो तेव्हा त्याला रिप्लाय येतो की, “मी तिची आई बोलतेय, तिचा मृत्यू झाला आहे.”
हेही पाहा- “तुमच्या झोपेसाठी रस्त्याची सुरक्षा खाटेवर…?” वाहतूक पोलिसांनी शेअर केलेला मजेशीर Video व्हायरल
हे चॅट @wtfyaarkajal नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या घटनेतील मुलीने ज्या प्रकारे फसवणूक करणाऱ्यालाच आपल्या जाळ्यात अडकवलं आहे, ते पाहून अनेकांनी मुलीचं कौतुक केलं आहे. या ट्विटवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काहींनी आता तुझ थेट पोस्टींग करतील कंपनीत असं म्हटल आहे. तर काहींनी हे चॅट खूप मजेशीर असल्याचं म्हटलं आहे.