‘कच्छा बदाम’ हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. या गाण्याची ४ महिन्यांपासून सोशल मीडियावर क्रेझ आहे. सगळ्यांनाच या गाण्याचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर रील्स असो किंवा स्टोरीज, लोक डान्स करून हे गाणे शेअर करतात. नुकताच सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक शाळेकरी मुलगी ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर अतिशय गोंडस पद्धतीने नाचताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी क्युट पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. कच्चा बदामाचे हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. मुलगी एवढ्या अप्रतिम पद्धतीने नाचतेय, हे पाहून मन थक्क होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा : Viral Video : स्नोबोर्डिंग करताना मुलगी स्वतःशीच बोलते, गोंडस व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : म्हशींच्या कळपाने केली जंगलाच्या राजाची केविलवाणी अवस्था, जीव वाचवण्यासाठी चढावे लागले झाडावर!

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवनीश शरणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोबत अवनीशने कॅप्शनही लिहिली आहे. “सर्वात सुंदर कच्चा बदाम’ असं लिहित हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला ९६,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.