सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना व्हायरल होत असतात. यामध्ये काही आपलं मनोरंजन करणाऱ्या तर काही आपणाला भावूक करणाऱ्या असतात. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कधी कोणती घटना व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशातच आता एका मुलीचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जे ट्विट स्विगी इन्स्टामार्टशी संबंधित आहे. ज्यामध्ये मुलीने स्विगीवरुन सॅनिटरी पॅड ऑर्डर केल्यानंतर त्यासोबत दिला अन्य काही गोष्टी मिळाल्याचं म्हटलं आहे.

आजकाल अनेक लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तर अनेकजण ऑनलाईन वस्तू ऑर्डर करण्यास घाबरतात. कारण, ऑर्डर डिलिव्हरी दरम्यान अनेक ग्राहकांना फसवणूक होण्याची भिती वाटते. परंतू सध्या एका मुलीचे असे ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने मासिक पाळीत वापरले जाणारे सॅनिटरी पॅड स्विगीवरुन मागवले होते. जेव्हा डिलिव्हरी बॉय तिची ऑर्डर देऊन गेला असता तिला सॅनिटरी पॅड्ससोबत, चॉकलेट्स आणि काही बिस्किटेही बॉक्समध्ये सापडली, जे पाहून तिला आश्चर्यचा धक्का बसला शिवाय आनंदही झाला.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Mother saved her daughter from an accident video went viral on social media
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही

हेही पाहा- स्कूटी आहे की ऑटो? एक दोन नव्हे तब्बल आठ जणांनी केला एकत्र प्रवास, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

शिवाय ऑर्डरसोबत आलेली चॉकलेट्स पाहून तिला प्रश्न पडला की स्विगीने तो बॉक्स तिला दिला की दुकानदाराकडून चुकून आला? त्यामुळे या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “मी @SwiggyInstamart वरून सॅनिटरी पॅड मागवले आणि मला बॅगच्या तळाशी चॉकलेट कुकीज सापडले. पण हे कोणी केले, स्विगीने की दुकानदाराने, याबाबच मला माहिती नाही?” महत्वाची बाब म्हणजे या मुलीच्या ट्विटची दखल खुद्द स्विगीने घेतली आणि तिच्या ट्विटला उत्तर दिलं, ज्यामध्ये स्विगीने लिहिलं की, “समीरा, तुमचा दिवस आनंददायी जावो, हीच आमची इच्छा आहे.”

हेही पाहा- धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नवा अवतार आला समोर; व्हायरल Video पाहताच समर्थक म्हणाले, “गुरुदेव पुन्हा…”

या मुलीचे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय यावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकान लिहिलं आहे की, इन्स्टामार्ट स्वतःच्या स्टोअरमधूनच अशा वस्तू पाठवतो. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं आहे की, ग्राहकांना आनंद देण्यासाठी आणि उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी स्विगीकडून ते मुद्दाम पाठवलं जाते, मलाही माझ्या ऑर्डरसोबत अनेक वेळा बिस्किटे, चॉकलेट्स, मिळाले आहेत.