Viral Post : जोडीदार शोधण्यासाठी सोशल मीडियावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डेटिंग ॲपद्वारे तुम्ही अनोळखी व्यक्तींशी संवाद साधून त्यांना ओळखून घेण्याचा प्रयन्त करू शकता. पण अनेकांना डेटिंग ॲप हे सोईस्कर वाटत नाहीत म्हणून ते त्यांचा उपयोग करण्यास बऱ्याचदा नकार देतात. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याचदा एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास ‘ऑर्डरसाठी मला डीएम करा’ अशी कॅप्शन आपण व्हिडीओखाली बघतो. डीएम म्हणजेच (DM) एखाद्याला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर डायरेक्ट संदेश पाठवणे होय. तर अनोळखी व्यक्तींकडून डायरेक्ट मेसेज (DM) आला की, बऱ्याचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण, आज एका व्हायरल पोस्टमध्ये याच डायरेक्ट मेसेजद्वारे एका जोडप्याची लग्नगाठ बांधली गेली आहे.
सोशल मीडियावर ही लव्ह स्टोरी (Love story) सध्या खूपच व्हायलर होत आहे. प्रेयसीने एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात संवादाचा स्क्रीनशॉट व जोडप्याचा एक फोटो आहे आणि यात तुम्हाला प्रेयसी आणि प्रियकर यांनी कशा प्रकारे संवाद साधला हे दिसून येईल. पाच वर्षांपूर्वी जोडप्याची ओळख होण्याआधी जोडीदार तरुणीला डायरेक्ट मेसेज करतो आणि “मला तू खूप आवडतेस”, असे म्हणतो. या मेसेजला तरुणीही प्रतिसाद देते. त्यांची अशा प्रकारे ओळख होऊन पाच वर्षांनी दोघे लग्नबंधनात अडकतात.
पोस्ट नक्की बघा :
डायरेक्ट मेसेजला दिला प्रतिसाद आणि जुळली लग्नगाठ :
तरुणांद्वारे करण्यात आलेल्या डायरेक्ट मेसेजकडे बहुतेक स्त्रिया, तरुणी दुर्लक्ष करतात किंवा अनोळखी व्यक्ती आहे म्हणून मेसेज डिलीट करून टाकतात. कारण- अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे अनेकांना सुरक्षित वाटत नाही. पण या तरुणीने डायरेक्ट मेसेजला प्रतिसाद दिला आणि तरुणीला तिचा जोडीदार भेटला. तसेच कालांतराने हे जोडपे लग्नबंधनातही अडकले. तरुणीने हा खास क्षण स्क्रीनशॉट आणि जोडीदारासोबतच्या एका फोटोसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे; ज्यात प्रेयसी आणि प्रियकर लग्नबंधात अडकले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @samxrzraf या महिलेच्या अकाउंटवरून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. दोघांच्या या खास नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तसेच पोस्ट पाहून अनेक जण या अनोख्या लव्ह स्टोरीला पसंती दाखवीत त्यांच्या भावना विविध शब्दांत कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून येत आहेत.