Viral video: लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही. यामुळे ते अनेकदा चुकीच्या गोष्टींसोबत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत सापडतात. थोड्यावेळासाठी पालकांचं लक्ष दुसरीकडे गेलं तरी हे चिमुकले काहीतरी कारनामा करतात. मात्र कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेततं. तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील आपापल्या कामात व्यग्र असतात. परिणामत: कित्येकदा त्यांचे लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत.अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ समोर आला आहे. खेळताना या मुलीचा पाय कढईमध्ये अडकला. कढईला जे वर्तुळाकार कान असतात त्यामध्ये तिनं आपला पाय अडकला. त्यानंतर पुढे काय झालं तुम्हीच पाहा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा