मगरीचं साध नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो. मग ती दिसल्यानंतर तर ‘पळा पळा’ म्हणायची वेळ येते. पण काही लोक अत्यंत निर्भीड असतात. कितीही भयानक प्राणी समोर आला तरीही ते घाबरत नाहीत. त्यांचं प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की अगदी आपल्या मुलांना भरवावं तसं ते आपल्या हातांनी प्राण्यांनाही भरवतात. पण कधी कधी हे धाडस आपल्या अंगावर येतं. एखाद्या मगरीला आपल्या हातांनी खाऊ घालण्याचं धाडस कुणी करेल का? होय, हे इतकं भयानक धाडस एका महिलेने केलंय. पण हे धाडस तिच्या अंगाशी आलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मगरीने महिलेची जी अवस्था केली ती पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मगरीला आपल्या हातांने खाऊ घालायला गेलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. नॅशनल पार्कमध्ये आपण मगरींना लांबून पाहिलं तरी धडकी भरते. मगरींच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मगर अगदी हुशारीने एका फटक्यात कशी शिकार करते हे आपल्याला माहितीच आहेत. त्यात त्या मगरी भुकेल्या असतील आणि आपण त्यांच्यासमोर गेलो तर मग काही खरं नाही. अशाच भुकेल्या मगरीला ही महिला खाऊ द्यायला गेली.

आणखी वाचा : स्वतःपेक्षा मोठा उंदीर पाहून मांजरीला धक्का बसला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही

पण मगरीसारखा खतरनाक प्राणी फक्त छोट्याश्या खाऊवर समाधान मानेल का? या व्हिडीओमधल्या मुलीने खाऊ देण्यासाठी एक हात पुढे केला, पण या मगरीने थेट या महिलेलाच आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. मगरीने आपल्या जबड्यात थेट या महिलेचा हात खेचून तिला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने या महिलेला पाण्यात उलटी पालटी करत लोळून तिला अत्यंत जखमी करून सोडलंय. यात महिला सुद्धा मगरीच्या जबड्यातला आपला हात कसाबसा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. पण मगरीच्या ताकदीपुढे तिचं काही चालू शकलं नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल महागले, गर्लफ्रेंडला भेटता येत नाही म्हणून बॉयफ्रेंडची ही व्यथा एकदा ऐकाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘मैं झुकेगा नहीं साला’ नवरदेवाने मारली पुष्पा स्टाईल; लोक म्हणाले, “झुक जा नहीं तो…”

यावेळी आजुबाजूच्या लोकांनी लगेच पुढे येत तिच्या बचावासाठी धडपड सुरू केली. बऱ्याच वेळच्या अथक प्रयत्नानंतर या लोकांना महिलेचा हात मगरीच्या जबड्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं. हा व्हिडीओ Nature Is Metal नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाख १५ हजारापर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.