एका जोडप्याशी संबंधित एक मजेशीर आणि तितकीच धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या घटनेमध्ये प्रियकराला त्याच्या प्रेयसीला किस करणं महागात पडलं आहे. कारण आजपर्यंत आपण प्रेमात लोक आंधळे होतात ऐकलं होतं, मात्र या घटनेतील प्रियकर प्रेमात चक्क बहिरा झाला आहे. कारण त्याच्या प्रेयसीने त्याला इतक्या जोरात किसं केलं की त्याची श्रवणशक्ती गेली आहे. ज्यामुळे त्याच्या वाट्याला बहिरेपण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विचित्र आणि मजेशीर प्रकरण चीनमधील आहे. येथील एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला १० मिनिटे किस केल्यानंतर त्याची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
हेही वाचा- OMG! महिलेच्या मेंदूत आढळली जिवंत अळी, पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का, म्हणाले, “जगातील पहिलीच…”
प्रेमात कसा बहिरा झाला प्रियकर?
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनी व्हॅलेंटाईन डे (२२ऑगस्ट) रोजी एक प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना किस करत होते. यावेळी प्रियकराच्या कानात अचानक एक विचित्र आवाज आला आणि त्याच्या कानात तीव्र वेदना सुरू झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील वेस्ट लेकवर डेटसाठी पोहोचले होते, त्याचवेळी एकमेकांना किस करताना हा अपघात झाला.
“कान बरे होण्यासाठी दोन महिने लागणार”
तरुणाला त्याच्या कानांनी नीट ऐकू येत नाहीये शिवाय त्याच्या कानात प्रचंड वेदना होत असल्याचे लक्षात येताच हे जोडपे हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासणी करून कानाचा पडदा फाटल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तरुणाची तपासणी केल्यानंतर त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी दोन महिने लागतील असे सांगितले.
किस करताना कानाचा पडदा कसा फाटला?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की जास्त उत्साहाने किस घेतल्याने शरीरात कंप निर्माण होतात, त्यामुळे कानाचा पडदा ताणला जातो. उच्च दाब आणि शरीरात वेगाने होणारे बदल यामुळे कानाचा पडदा फुटू शकतो. मात्र, अचानक ऐकू न येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००८ मध्येही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका चिनी महिला तिच्या प्रियकराचे चुंबन घेत असताना तिने स्वत:ची श्रवणशक्ती गमावली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, मागील महिन्यात दक्षिण चीनमधील एका जोडप्याची घरात टीव्ही पाहत असताना श्रवणशक्ती गेली होती.