सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ देखील असतात. कधी प्राणी शिकार करताना दिसतात तर कधी मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसतात. यामध्ये मगरींचेही अनेक व्हिडीओ समोर येत असतात. मगरींच्या तावडीत कोणी सापडले तर सुटका मिळणे जवळपास अशक्य असते. सध्या अशाच एका मगरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगवार काटा येऊ शकतो. व्हिडीओमध्ये ही मगर एक व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण हा व्यक्ती त्यावेळी जे काही करतो ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, तळ्याच्या परिरसरात एक वयस्कर व्यक्ती उभा आहे त्यांच्या हातात पॅन आहे. तेवढ्यात एक मग त्याच्या अंगावर धावून येते आणि त्याला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते पण तो वयस्कर व्यक्ती त्याच्या हातातील पॅन जोरात मगरीच्या जबड्यावर मारतो. त्यानंतर ती पुन्हा अंगावर धावते. त्यानंतर व्यक्ती पुन्हा पॅनने जोराक मगरीच्या जबड्यावर मारतो. त्यानंतर मगर वळते आणि झूडपांमधून गायब होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. व्हिडीओ इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पॅनने मारल्यानंतर मगर पळून जाते हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.

हेही वाचा – टेनिस बॉल कसा तयार केला जातो? फॅक्टरी व्हिडीओ दाखवली संपूर्ण प्रक्रिया, एकदा नक्की बघा!

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, आजोबा म्हणत असतील मी हे Tangled चित्रपटात पाहून शिकलो. दुसऱ्याने लिहिले, “आजोबा खरचं उशार आहेत. तुम्ही स्टॅंडअप कॉमेडी नक्की करू शकता.” तिसरा म्हणाला, ‘पॅनची जाहिरात करण्यासाठी ही खूप चांगली जाहिरात आहे.” चौथा म्हणाला, या म्हाताऱ्या लोकांनी कसलीच भिती वाटत नाही.

हेही वाचा – “एवढी घाई कशासाठी!” पैसे काढण्यासाठी स्कूटरवर बसून थेट एटीएमध्ये घुसला व्यक्ती; व्हायरल फोटो पाहून आवरेना हसू

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर वावरणाऱ्या मगरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती मगरीला हुसकवाण्याचा प्रयत्न करतो. पण संधी मिळताच मगर हल्ला करते आणि त्याचा पाय जबड्यात पकडून त्याला खाली पाडते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The grandfather hit crocodile by non stick pan what happened next you will not believe your eyes watch viral video snk