Viral Video : असं म्हणतात, गावाकडची माणसं खूप साधी भोळी असतात. त्यात वृद्ध व्यक्ती त्यांच्या अनेक कृतीने अनेक लोकांचे मन जिंकतात. सोशल मीडियावर या वृद्ध लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावुक करणारे असतात.

आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडच्या वृद्ध जोडप्याने असे काही केले की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वृद्ध जोडपे डिलीव्हरीनंतर नवजात बाळाला घेऊन आलेल्या डॉक्टरांच्या पाया पडताना दिसतात. एवढंच काय तर वृद्ध आजोबा डॉक्टरांच्या हातात ५०० रुपयांची नोट पण देतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. (The grandparents touched the feet of the doctor who brought the newborn baby to show them after delivery)

हेही वाचा : “तू नुसतं पदराला बांंधायचं राहिलंय गं” बायकोला वैतागलेल्या नवऱ्यानं गायलं भन्नाट गाणं; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

नवजात बाळाला घेऊन आलेल्या डॉक्टरांच्या पाय पडले आजी-आजोबा

हा व्हायरल व्हिडीओ एका हॉस्पिटलमधील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक महिला डॉक्टर आजी आजोबांना व कुटुंबाना दाखवायला बाळ हातात घेऊन वार्ड बाहेर येते. डॉक्टरांना बाळासह येताना पाहून आजी आजोबा डॉक्टरांकडे जातात आणि त्यांच्या पाया पडतात व डॉक्टरांचे आभार मानतात. सर्वजण त्या बाळाचे फोटो व व्हिडीओ काढताना दिसतात. त्यानंतर त्या बाळाचे आजोबा डॉक्टरच्या हाताता ५०० रुपयांची नोट देताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे फक्त गावाकडची लोकंच करू शकतात.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : मुंबईच्या रस्त्यावर बाईकस्वाराने केली शिवीगाळ, लहान मुलाबरोबर असलेल्या कारचालकाने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

hebaghbhava या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी आजोबांच्या साधेभोळेपणाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरेपणाने जगणारी शेवटची पिढी.” तर एका युजरने लिहिलेय, “आज बघितलेले सर्वात सुंदर व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी माझ्या घरापासून खूप लांब जॉबसाठी राहते पण असे व्हिडिओ पाहिले की खूप भारी वाटतं” एक युजर लिहितो, “इतकी भावनिक ही शेवटची पिढी”