सोशल मीडियावर (Socail Media) दररोज शेकडो लग्नाचे व्हिडीओ (Wedding Video) अपलोड केले जातात, त्यातील काही व्हिडीओ असे असतात जे युजर्सना खूप आवडतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. लग्नाच्या वरमाळा समारंभात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालताना आपण सहसा पाहिले आहे. मात्र, गेल्या एक-दोन वर्षांपासून जयमालाचा ट्रेंड बदलत चालला आहे. वधू वधूला पुष्पहार घालणार इतक्यात ती माघारी जाऊ लागली. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडीओतही (Viral Video) पाहायला मिळाला.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू-वर वरमाळा सोहळ्यासाठी स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या भोवती पाहुणे उभे आहेत. काही छायाचित्रकार वाट पाहत आहेत की वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालताच ते फोटो क्लिक करतील. मात्र, वधूने पुष्पहार घालण्यास नकार दिल्याने तसे होताना दिसून आले नाही. वधूने माळा घालण्यास नकार देताच वराला राग आला आणि तो जवळच ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसला.

(हे ही वाचा: लग्नात नववधूला हार घालतानाच घसरला नवरदेवाचा पायजमा आणि…; बघा मजेशीर video)

(हे ही वाचा: घोडीसोबत उचलून नवरदेवाला लोकांनी बसवलं खाटेवर आणि हवेतच…; बघा वरातीतला भन्नाट Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर new.flower.decoration नावाच्या अकाऊंटवरून अपलोड केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘शेवटचे दृश्य पहा’. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ५२० हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. २०० हून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader